शाळेत अध्ययन अक्षमता असलेली मुले काही असतात.ती ओळखून त्यांना योग्य पद्धतीने अध्ययन अनुभव देणे आवश्यक असते.त्याकरिता त्यांच्या लक्षणांचा अभ्यास करणे आधि गरजेचे असते.
अध्ययन अक्षम असलेल्या मुलांमध्ये आढळणारी ठळक लक्षणे-
शैक्षणिक अक्षमता असलेल्या मुलामध्ये वगोयामानुसार अपेक्षित असणा-या त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कुशलतेमध्ये सामान्य मुलांपेक्षा तफावत आढळते .या तफावती विशिष्ट प्रकारच्या त्रुर्टीमुळे निर्माण झालेल्या असतात . उदा . आकलन शक्ती,हालचाली मधील सुसंबद्धता इ .
अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये : -
१) लक्ष लवकर विचलित होते.
२) एका जागी स्थिर बसू शकत नाही, चंचल असतो .
3) लगेच चिडतो व राग येतो .
४) साधी कोडी लावता येत नाहीत.
५) आकार ओळखतांना गोंधळून जातो.
६) वस्तू घेताना अंतराचा अंदाजा येत नाही.
७) अंतराचा अंदाज नसल्यामुळे धडपडतो.
८) साधे व सोपे खेळ शिकवायला वेळ लागतो.
९) सरलरेषेवर चालता येत नाही .
१०) विनोद समजत नाही.
११) प्रसंगानुरूप प्रतिसाद देत नाही.
१२) कामाची सुरुवात करायला आळस करतो.
१३) सांगितलेल्या सुचना योग्य पद्धतीने पाळत नाही.
१४) शिस्त लावण्यास कठीण जाते.
१५) बदल मान्य करू शकत नाही .
१६) एकावेळी एकच सूचना पाळतो.
१७) समान दिसणा-या अक्षरात गोंधळ करतो .
१८) डावी व उजली बाजू कळत नाही .
१९) इतरांशी सुसंबद्ध व सुस्पष्ट बोलता येत नाही.
वरील लक्षणे दिसल्यास शिक्षकांनी जागरूक होणे आवश्यक असते - सर्व लक्षणें एका विद्यार्थ्यामध्ये असतीलच असे नाही . परंतु काही लक्षणे दिसल्यास त्याकरिता वेगळे अध्ययन अनुभव व अभ्यास पद्धती आखणे गरजेचे असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा