पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

परिपाठ दि 30/11/2015

    🌀💢💢 परीपाठ 💢💢🌀
🔳🔳🔲🔲🔘🔘🔲🔲🔳🔳
🔹🔹दिनांक :-  30/11/2015🔹🔹
       🔸🔸वार -  सोमवार🔸🔸
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
      🌀🇮🇳🌟 राष्ट्रगीत 🌟🇮🇳🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
      🌀🔶🌟 प्रतिज्ञा 🌟🔶🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌀🇮🇳🌟 संविधान 🌟🇮🇳🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१)    🔷 आजचे पंचाग 🔷
        =============
सोमवार, 30 नवंबर 2015

सूर्योदय. 6:55:35
सूर्यास्त.  18:0:46
चन्द्र उदय.  21:27:43
सूर्य राशि  वृश्चिक
चंद्रा राशि   कर्क
ऋतु   हेमंत
अयन.  दक्षिणायन
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
२)    🔶 सुविचार 🔶
       ===========
सर्वकाही आनंदीवृत्तीने केल्यास करायला कठीण असे कोणतेच काम असणार नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
३)    🔷 म्हणी व अर्थ  🔷
        =============
 गर्जेल तो पडेल काय?
  – पोकळ बडबडणारा काही करून दखवत नाही
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
४)    🔶 सुभाषित 🔶
       ===========
विद्याविहीनः पशुः ।
     $  अर्थ :-
 विद्याविहीन मनुष्य हा मनुष्य नसून पशूच आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
५)   💥 दिनविशेष 💥
       ===========
     $: ३० नोव्हेंबर : सोमवार :$

हा या वर्षातील ३३४ वा दिवस आहे.

     $ महत्त्वाच्या घटना $
   ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

२००० : पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन ’एन्डेव्हर’ या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले.
१९९६ : ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला ’महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान. हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्‍च पुरस्कार आहे.
१९९५ : ’ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म’ संपल्याची अधिकृत घोषणा
१९६६ : बार्बाडोसला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९१७ : कलकत्ता येथे ’आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्युट’ची स्थापना.

    $ जन्मदिवस / जयंती / वाढदिवस $
     ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

१९६७ : राजीव दिक्षीत – सामाजिक कार्यकर्ता (मृत्यू: ३० नोव्हेंबर २०१०)
१९४५ : वाणी जयराम – पार्श्वगायिका
१९३५ : आनंद यादव – लेखक
१९१० : कविवर्य बा. भ. बोरकर ऊर्फ ’बाकीबाब’ (मृत्यू: ९ जुलै १९८४)
१८७४ : विन्स्टन चर्चिल – दुसर्‍या महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक, वृत्तपत्रकार, थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: २४ जानेवारी १९६५)

१८५८ : जगदीशचंद्र बोस – नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ, वनस्पतींमधील प्रतिक्षिप्त क्रियांवर मूलभूत संशोधन (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९३७)

१६०२ : ऑटो व्हॉन गॅरिक – वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: २१ मे १६८६)

     $ मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन $
    ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

२०१२ : इंदर कुमार गुजराल – भारताचे १२ वे पंतप्रधान (जन्म: ४ डिसेंबर १९१९)
२०१० : राजीव दिक्षीत – सामाजिक कार्यकर्ता (जन्म: ३० नोव्हेंबर १९६७)
१९९५ : वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे – साहित्यिक (लघुकथा, लोककथा, बालवाड़्मय, चरित्र, अनुवाद), विचारवंत .
===========================

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
६)    ⭕ स्फुर्तिगीत ⭕
      ============
$ शतकांच्या यज्ञातुन $

शतकांच्या यज्ञातुन उठली एक केशरी ज्वाला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला

शिवप्रभूंची नजर फिरे अन्‌ उठे मुलूख सारा
दिशा-दिशा भेदीत धावल्या खड्गाच्या धारा
हे तुफान स्वातंत्र्याचे
हे उधाण अभिमानाचे
हे वादळ उग्र वीजांचे
काळोखाचे तट कोसळले चिरा-चिरा ढळला

कडेकपारी घुमू लागले विजयाचे गान
जळल्या रानातुनी उमलले पुन्हा नवे प्राण
रायगडावर हर्ष दाटला खडा चौघडा झडे
शिंगांच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे
शिवराय भाग्य देशाचे
हे संजीवन प्राणांचे
हे रूप शक्तियुक्तीचे
हा तेजाचा झोत उफाळुन सृष्टितुन आला

गंगा-सिंधू-यमुना-गोदा कलशातुन आल्या
शिवरायाला स्‍नान घालुनी धन्य धन्य झाल्या
धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार
अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार

प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस
सिंहासनाधिश्वर महाराजाधीराज शिवछत्रपती महाराज

'शिवछत्रपतींचा जय हो !'
'श्रीजगदंबेचा जय हो !'
'या भरतभूमिचा जय हो !'
जयजयकारातुनी उजळल्या शतकांच्या माला
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
७)    ⭕ देशभक्ती गीत ⭕
       ==============
$ उठा राष्ट्रवीर हो $

उठा राष्ट्रवीर हो
सुसज्ज व्हा उठा चला, सशस्‍त्र व्हा उठा चला
उठा राष्ट्रवीर हो

युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे
मिळुन सर्व शत्रूला क्षणात चारुया खडे
एकसंघ होऊनी लढू चला, लढू चला
उठा उठा, चला चला

वायुपुत्र होऊनी धरू मुठीत भास्करा
होऊनी अगस्तीही पिऊन टाकू सागरा
रामकृष्ण होऊ या, समर्थ होऊ या चला
उठा उठा, चला चला

चंद्रगुप्‍त वीर तो फिरुन आज आठवू
शूरता शिवाजीची नसानसांत साठवू
दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला
उठा उठा, चला चला

यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती
दुष्ट शत्रू मारुनी तयात देऊ आहुती
देवभूमी ही अजिंक्य दाखवू जगा चला
उठा उठा, चला चला
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
८)    💢🙏 प्रार्थना 🙏💢
        ==============
$ असो तुला देवा माझा $
               -साने गुरुजी
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार
तुझ्या दयादातृत्वाला अंत नाही पार ॥धृ॥

तुझ्या कृपेने रे होतील फुले फत्तराची
तुझ्या कृपेने रे होतील मोती मृत्तिकेची
तुझ्या कृपेने रे होतील सर्प रम्य हार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥१॥

तुझ्या कृपेने होइल उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने होइल सुधा त्या विषाची
तुझ्या कृपेने होइल पंगु सिंधुपार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥२॥

तुझ्या कृपासिंधूमधला बिंदू जरी मिळेल
तरी प्रभो ! शतजन्मांची मतृषा शमेल
तुझे म्हणुनी आलो राया ! बघत बघत दार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥३॥
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 ९)    🌀🌀 बोधकथा 🌀🌀
        ================
$ अनुभवाच्‍या जोरावर यश $

एका व्‍यापा-याने दुस-या प्रांतात जाऊन व्‍यापार करण्‍याचा निर्णय घेतला. त्‍याच्‍या शेजा-यानेही तोच निर्णय घेतला. पहिला व्‍यापारी म्‍हणाला, भाई आपण दोघेजण एकत्र जाण्‍याने अडचण निर्माण होईल एक तर तू पहिल्‍यांदा जा किंवा मला तरी जाऊ दे. दुस-या व्‍यापा-याने विचार केला, आपण पहिल्‍यांदा जाण्‍यात फायदा आहे, रस्‍त्‍याने सरळ गेलो तर बैलांना चारापाणी मिळेल. मनाला वाटेल त्‍या किंमतीवर सामान विकेन. त्‍याने पहिल्‍यांदा जाण्‍याचा निर्णय घेतला. पहिल्‍या व्‍यापा-याला वाटले, या व्‍यापा-याच्‍या जाण्‍याने गाडीवाट चांगली तयार होईल. याचे बैल कडक गवत खातील व माझ्या बैलांना चांगले मऊ गवत खायला मिळेल. नव्‍या खोदलेल्‍या विहीरीचे पाणी प्‍यायला मिळेल. शिवाय चांगल्‍या किंमतीवर सौदा करता येईल. दुस-या व्‍यापा-याच्‍या माणसांनी पाण्‍याने भरलेल्‍या घागरी बरोबर घेतल्‍या आणि प्रवासाला सुरुवात केली. वाटेत काही भिजून आलेले लोक त्‍यांना भेटले, त्‍या लोकांनी व्‍यापा-याला सांगितले, पुढे पाऊस खूप आहे, पाणी घेऊन जाण्‍याची गरज नाही. व्‍यापा-याने त्‍यांचा सल्‍ला ऐकला. त्‍या रात्रीच त्‍या व्‍यापा-याचा काफिला लुटला गेला. व्‍यापारीही मारला गेला.एक महिन्‍याने पहिला व्‍यापारी पण प्रवासाला निघाला, तेव्‍हा दरोडेखोराच्‍या माणसांनी त्‍यालाही खोटे बोलून भुलविण्‍याचा प्रयत्‍न केला पण पहिला व्‍यापारी त्‍यांच्‍या बोलण्‍याला भुलला नाही. व्‍यापा-याच्‍या माणसांनी दरोडेखोरांची माणसे कशी काय ओळखली असे व्‍यापा-याला विचारले असता व्‍यापारी म्‍हणाला, अरे या दिवसात या भागात पाऊस कसा पडेल हा साधा विचार मी डोक्‍यात आणला व दरोडेखोरांची माणसे मला कळून आली. व्‍यापारी पुढे गेला व त्‍याच्‍या धंद्यात अशा छोट्याशा गोष्‍टींमुळे तो यशस्‍वी झाला.

तात्‍पर्य : अनुभवाने माणूस यशस्‍वी होतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१०)  💥 प्रेरणादायी विचार 💥
        ================
 स्वत:चा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक बाबिंचेच चिंतन सतत केले पाहिजे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
११)   🔳 सामान्य नान 🔳
        ==============
१) कोणास आद्यक्रांतिकारक म्हणून संबोधले जाते?
२) म. गांधीच्या वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते?
३) २ सप्टे.१९४६ रोजी राष्ट्रसभेने कोणाच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन केले?
=======================
     :उत्तरे :
१) वासुदेव बळवंत फडके
२) आचार्य विनोबा भावे
३) पं. जवाहरलाल नेहरू
========================
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१२)   💢थोरव्यक्ती परिचय💢
           ==============
       $ जगदीशचंद्र बोस $
       ==============
                  यांची आज जयंती
 (१८५८-१९३७)
हे एक भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच पुरातत्त्वज्ञ होते.

   $ जन्म व बालपण $
   ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला आॅफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, राय आडनावाचे रे झाले तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले.

त्यांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असे. सर्व झाडे एकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसर्‍याची तांबूस? असा फरक का पडतो असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     💢💢💢💥🙏🙏💥💢💢💢

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा