🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
🌀💢💢 परीपाठ 💢💢🌀
🔳🔳🔲🔲🔘🔘🔲🔲🔳🔳
🔹🔹दिनांक :- 28/11/2015🔹🔹
🔸🔸वार - शनिवार🔸🔸
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌀🇮🇳🌟 राष्ट्रगीत 🌟🇮🇳🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌀🔶🌟 प्रतिज्ञा 🌟🔶🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌀🇮🇳🌟 संविधान 🌟🇮🇳🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१) 🔷 आजचे पंचाग 🔷
=============
28/शनिवार
कृष्ण पक्ष तृतियानक्षत्र : आर्द्रा
योग : साध्य
करण : वणीज
सूर्योदय : 06:53
सूर्यास्त : 17:59
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
२) 🔶 सुविचार 🔶
===========
प्रेमळ व सत्य बोलण्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागत नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
३) 🔷 म्हणी व अर्थ 🔷
=============
नाव मोठे लक्षण खोटे
– कीर्ती मोठी पण कृती छोटी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
४) 🔶 सुभाषित 🔶
===========
ईर्षुर्घृणी न सन्तुष्टः
क्रोधनो नित्यशङ्कितः।
परभाग्योपजीवी च षडेते
नित्यदुःखिताः।।
$ अर्थ :- $
ईर्षा करणारा,घृणा करणारा,असन्तुष्ट,क्रोधी,शंकाखोर आणि परभाग्य उपजीवी हे सहा नेहमी दुःखी असतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
५) 💥 दिनविशेष 💥
============
: २८ नोव्हेंबर : शनिवार
समता दिन
हा या वर्षातील ३३२ वा दिवस आहे.
$ महत्त्वाच्या घटना $
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
२००० : तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर
१९७५ : पूर्व तिमोरला (पोर्तुगालपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९६७ : जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी ’पल्सार’ तार्यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.
१९६४ : नासा (NASA) चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.
१९६० : मॉरिटानियाला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९३८ : ’प्रभात’चा ’माझा मुलगा’ हा चित्रपट रिलीज झाला. (कथा, पटकथा, संवाद: य. गो. जोशी, दिग्दर्शक: के. नारायण काळे, कलाकार: शाहू मोडक, शांता हुबळीकर, वसंत ठेंगडी, मा. छोटू)
१८२१ : पनामाला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
$ जन्मदिवस / जयंती / वाढदिवस $
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
१८७२ : रामकृष्णबुवा वझे – गायक नट, बलवंत संगीत मंडळी आणि ललित कलादर्श या नाटक कंपन्यांमधे त्यांनी गायनगुरु म्हणून काम केले. केशवराव भोसले, मास्टर दीनानाथ, भालचंद्र पेंढारकर, हरिभाऊ घांग्रेकर हे त्यांचे काही नामांकित विद्यार्थी होत. (मृत्यू: ५ मे १९४३)
१८५७ : अल्फान्सो (बारावा) – स्पेनचा राजा (मृत्यू: २५ नोव्हेंबर १८८५)
१८५३ : हेलन व्हाईट – डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला (मृत्यू: २८ आक्टोबर १९४४)
$ मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन $
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
२०१२ : झिग झॅगलर – अमेरिकन लेखक (जन्म: ६ नोव्हेंबर १९२६)
२००१ : अनंत काणे – व्यावसायिक रंगभूमीवर दर्जेदार नाटकांच्या निर्मितीद्वारे आपला ठसा उमटवणारे निर्माते, ’अभिजात’ या संस्थेच्या बॅनरखाली त्यांनी ’गुंतता ह्रुदय हे’, ’सूर राहू दे’, ’सुरूंग’, ’मन पाखरू पाखरू’, ’आनंदी गोपाळ’, ’वर्षाव’ इ. दर्जेदार नाटकांची निर्मिती केली
१९९९ : हनुमानप्रसाद मिश्रा – १९८८ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते बनारस घराण्याचे सारंगीवादक
१९६८ : एनिड ब्लायटन – बालसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लिश लेखिका (जन्म: ११ ऑगस्ट १८९७)
१९६७ : पांडुरंग महादेव तथा ’सेनापती’ बापट – सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक (जन्म: १२ नोव्हेंबर १८८०)
१९६३ : त्र्यंबक शंकर शेजवलकर – इतिहासकार व लेखक
१९६२ : कृष्ण चंद्र तथा ’के. सी.’ डे – गायक, संगीत संयोजक व अभिनेते
१८९३ : सर अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी (जन्म: २३ जानेवारी १८१४)
१८९० : जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ ’महात्मा फुले’ – श्रेष्ठ समाजसुधारक, विषेशत: समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत
===========================
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
६) ⭕ स्फुर्तिगीत ⭕
============
$ स्वर्गाहुनही प्रिय आम्हांला $
स्वर्गाहुनही प्रिय आम्हांला अमुचा सुंदर भारत देश
आम्ही सारे एक, जरीही नाना जाती, नाना वेष
या भूमीच्या आम्ही कन्या, कोमल भाव मनी
फूलकोवळ्या तरी प्रसंगी होऊ रणरागिणी
आवेशाने घुसू संगरी चढवुनिया रणवेष
श्रीरामाचे, शीकृष्णाचे अजून आहे स्मरण मनास
वीर शिवाजी, प्रताप, बाजी.. थोर आमुचा हा इतिहास
रक्तामधुनी वीज वाहते उरात भरतो नव आवेश
हिमायलापरि शीतल आम्ही, आग पेटती परि उरात
पाऊल परके पडता येथे बळ वज्राचे याच करांत
या देशाची गौरवगाथा हाच अम्हाला दे आदेश
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
७) ⭕ देशभक्ती गीत ⭕
==============
$ उधळीत शतकिरणां $
उधळीत शतकिरणां उजळीत जनहृदया
नभात आला रे प्रभात रवि उदया
तिमिराची रजनी गेली रे गेली लया
थरकति चंचल जललहरी, नटली सजली वसुंधरा
मधुमय मंगल स्वरलहरी चढल्या भिडल्या दिगंतरा
धिंधिंधिंता धिंधिंधिंता दुंदुभीच्या नादासंगे
अंबराच्या मंदिरात मंद्र वाजे सनई
जय जय बोला, जय जय बोला कोटीकोटी कंठांनि
भारताच्या भविष्याच्या पहाटेच्या समयी
रे संपली ती शर्वरी, ये हा रवि या अंबरी
चल करि वंदन नवयुवका, गगनी विलसे नवा रवि
तुजसि न बंधन कधी पथिका, दिसली तुजला दिशा नवी
दिडदिडदारा दिडदिडदारा, प्राण आता झंकारती
तारुण्याच्या सामर्थ्याला कारुण्याची साथ दे
या भूमीला आकाशाचे आशीर्वाद लाभावे
पौरुषाला विक्रमाचे वैभवाचे हात दे
ही प्रार्थना, ही कामना, ही भावना, ही अर्चना
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
८) 💢🙏 प्रार्थना 🙏💢
==============
$ सावीञी $
असो तुला सावित्री ! माझा सदा नमस्कार
तुझ्या कर्तृत्वाला अंत नाही पार ॥धृ॥
तुझ्या कृपेने रे शिकली मुले मागासांची
तुझ्या कृपेने रे केली आम्हीे सैर विदेशांची
तुझ्या कृपेने रे झाली स्वप्ने ही साकार
असो तुला सावित्री ! माझा सदा नमस्कार ॥१॥
तुझ्या कृपेने उघडली दारे मुलींना शाळांची
तुझ्या कृपेने झाली क्रांती शिक्षणाची
तु आम्हा करिता झेलूनी दगडशेणाचे वार
असो तुला सावित्री ! माझा सदा नमस्कार ॥२॥
तुझ्या गुणांचा अंश जरी मिळेल
तरी आम्हा ! जीवनाचा अर्थ कळेल
तुझे ज्योतीबासंगचे बलिदान अपार!
असो तुला सावित्री ! माझे वंदन त्रिवार ॥३॥
कवी --
--श्री संतोष भोंबळे शेगाव
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
९) 🌀🌀 बोधकथा 🌀🌀
================
$ आत्मनियंत्रणाचे महत्व $
एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्ट शिकण्यास तयार होत असे. त्याने धनुष्यबाण तयार करण्यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणा-यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्याच्यात अहंकार आला, तो आपल्या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्यांनी जेव्हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्हा त्यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्यावी जी आतापर्यंतच्या कलांमध्ये श्रेष्ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्याच्याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्ही कोण आहात. बुद्ध म्हणाले,''मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे.'' मुलाने यावर त्यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्हणाले,''जो धनुष्यबाण वापरतो त्याला त्याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्याला ते काम माहित असते. पण जो ज्ञानी आहे तो स्वत:वर नियंत्रण ठेवतो,'' मुलाने विचारले, ते कसे काय. बुद्ध म्हणाले, '' जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्य तर स्वत:ला नियंत्रणात ठेवण्याचे असते.
तात्पर्य :- ज्यांना स्वत:ला नियंत्रणात ठेवता येते त्याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला आनंदी ठेवतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१०) 💥 प्रेरणादायी विचार 💥
================
जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका,कारण पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास घडवीत नसतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
११) 🔳 सामान्य नान 🔳
==============
१) कोणास आद्यक्रांतिकारक म्हणून संबोधले जाते?
२) म. गांधीच्या वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते?
३) २ सप्टे.१९४६ रोजी राष्ट्रसभेने कोणाच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन केले?
=======================
:उत्तरे :
१) वासुदेव बळवंत फडके
२) आचार्य विनोबा भावे
३) पं. जवाहरलाल नेहरू
========================
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१२) 💢थोरव्यक्ती परिचय💢
==============
$ जोतीराव गोविंदराव फुले $
===================
जन्म: एप्रिल ११, इ.स. १८२७
कटगुण, सातारा,महाराष्ट्र
मृत्यू: नोव्हेंबर २८, इ.स. १८९०
पुणे, महाराष्ट्र
वडील: गोविंदराव फुले
आई: चिमणाबाई गोविंदराव फुले
पत्नी: सावित्रीबाई फुले
*महात्मा जोतीबा फुले*
------------------------------
(एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०)
हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले.
@ सामाजिक कार्य @
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -
“ विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।"
जोतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.
वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या विचारवंताच्या ‘राईटस् ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे आपल्या पत्नी सावित्रीबाईंना त्यांनी साक्षर केले. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्याचा आसूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा