पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

बुधवार, २ डिसेंबर, २०१५

दिनांक :- 02/12/2015🔹🔹

💻💻महाराष्ट्र अॅडमीन पॅनल💻💻
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
    🌀💢💢 परीपाठ 💢💢🌀
🔳🔳🔲🔲🔘🔘🔲🔲🔳🔳
🔹🔹दिनांक :-  02/12/2015🔹🔹
       🔸🔸वार -  बुधवार🔸🔸
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
      🌀🇮🇳🌟 राष्ट्रगीत 🌟🇮🇳🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
      🌀🔶🌟 प्रतिज्ञा 🌟🔶🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌀🇮🇳🌟 संविधान 🌟🇮🇳🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१)    🔷 आजचे पंचाग 🔷
        =============
02 कृष्ण पक्ष सप्तमीनक्षत्र : मघा
योग : एन्द्र
करण : विष्टी
सूर्योदय : 06:55
सूर्यास्त : 18:00
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
२)    🔶 सुविचार 🔶
       ===========
वेळेवर घेतलेल्या चांगल्या व सकारात्मक निर्णयाचा कधीच पश्चाताप होत नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
३)    🔷 म्हणी व अर्थ  🔷
        =============
 चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे

  – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
४)    🔶 सुभाषित 🔶
       ===========
ईर्षुर्घृणी न सन्तुष्टः
        क्रोधनो नित्यशङ्कितः।
परभाग्योपजीवी च षडेते
      नित्यदुःखिताः।।

     $ अर्थ :- $
ईर्षा करणारा,घृणा करणारा,असन्तुष्ट,क्रोधी,शंकाखोर आणि परभाग्य उपजीवी हे सहा नेहमी दुःखी असतात.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
५)   💥 दिनविशेष 💥
       ============
२ डिसेंबर बुधवार

      $ जागतिक दिवस $
     ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

राष्ट्र दिन : संयुक्त अरब अमीराती, ब्रिटनपासून स्वातंत्र्य.
राष्ट्र दिन : लाओस.

       $ ठळक घटना, घडामोडी $
       ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

१४०२ : लीपझीग विद्यापीठ सुरू झाले.
१८०४ : नोत्र देम कॅथेड्रलमध्ये नेपोलियन बोनापार्टचा फ्रांसच्या सम्राटपदी राज्याभिषेक.
१८०५ : ऑस्टर्लित्झची लढाई - नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्त्वाखाली फ्रांसच्या लश्कराचा रशिया व ऑस्ट्रियाच्या संयुक्त दलावर विजय.
१८४५ : मॅनिफेस्ट डेस्टिनी - पश्चिमेचे प्रदेश काबीज करावयाची अमेरिकन काँग्रेसला उद्देशून अमेरिकन अध्यक्ष जेम्स पोकची घोषणा.
१८४८ : फ्रांझ जोसेफ पहिला ऑस्ट्रियाच्या सम्राटपदी.
१८५२ : नेपोलियन तिसरा फ्रांसच्या सम्राटपदी.
१९३९ : न्यू यॉर्क शहरातील ला ग्वार्डिया विमानतळाचे उद्घाटन.
१९७१ : संयुक्त अरब अमीरातीची स्थापना. अबु धाबी, अजमान, फुजैरा, शारजा, दुबई व उम-अल-कुवैन सदस्य.
१९८८ : बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी.
१९८९ : भारताच्या पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा शपथविधी.
२००१ : एन्रॉनने दिवाळे काढल्याचे जाहीर केले.

      $ जन्म, वाढदिवस $
      ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

१९०६ : एरिक डाल्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९१० : बॉब न्यूसन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९१२ : जॉर्ज एमेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९४९ : फ्रांसिस ऍलन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९३३ : के. वीरमणी, द्रविड मुनेत्र कळघम नेता.
१९३७ : मनोहर जोशी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष.
१९४४ : इब्राहीम रुगोवा, कोसोव्होचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
१९४५ : ऍलन थोमसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९४७ : धीरज परसाणा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९६६ : क्लाइव्ह एकस्टीन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९७२ : सुजित सोमसुंदर, भारतीय क्रिकेट खेळाडू.

  $ मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन $
    ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

१३४८ : हानाझोनो, जपानी सम्राट.
१५४७ : हर्नान कोर्तेझ, स्पॅनिश काँकिस्तादोर.
१९०५ : अनंत काणेकर, मराठी कवी, लेखक, पत्रकार.
१९८० : चौधरी मुहम्मद अली, पाकिस्तानचा पंतप्रधान.
===========================
🌟 सतिष बोरखडे दारव्हा 7875840444
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
६)    ⭕ स्फुर्तिगीत ⭕
      ============
 $आम्ही चालवू हा पुढे $

गुरुने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा

पिता-बंधु-स्‍नेही तुम्ही माऊली
तुम्ही कल्पवृक्षातळी सावली
तुम्ही सूर्य आम्हां दिला कवडसा !

जिथे काल अंकूर बीजातले
तिथे आज वेलीवरी ही फुले
फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा !

शिकू धीरता, शूरता, वीरता
धरू थोर विद्येसवे नम्रता
मनी ध्यास हा एक लागो असा !

जरी दुष्ट कोणी करू शासन
गुणी सज्जनांचे करू पालन
मनी मानसी हाच आहे ठसा !

तुझी त्याग-सेवा फळा ये अशी
तुझी कीर्ति राहील दाही दिशी
अगा पुण्यवंता भल्या माणसा !
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
७)    ⭕ देशभक्ती गीत ⭕
       ==============
   $ जय जवान जय किसान $

एक सूर एक ताल, एक गाऊ विजयगान
जय जवान, जय किसान !
जय जवान, जय किसान, जय जय !

अखिल देश पाठीशी, 'जवान' व्हा रणी चला
किसान होऊनी कसा, भूमी सस्य श्यामला
यौवनास योग्य रे, शौर्य आणि स्वाभिमान
जय जवान, जय किसान !

शत्रू मित्र जाणुनी सावधान सर्वदा
आपल्या श्रमे करू प्रसन्‍न देवी अन्‍नदा
उभ्या जगात आपुली सदैव उंच ताठ मान
जय जवान, जय किसान !

अजिंक्य सैन्य आमचे, गाजवी पराक्रमा
भूमिदास दाखवी निर्मितीत विक्रमा
स्वतंत्र हिंद देश हा, स्वतंत्र सिंधू आसमान
जय जवान, जय किसान !
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
८)    💢🙏 प्रार्थना 🙏💢
        ==============
    $ स्वातंत्र्याची घुमे तुतारी $

स्वातंत्र्याची घुमे तुतारी दुमदुमली धरती
हे शिवशंकर मुक्ती दायिनी जय जय जनशक्ती

कणकणातून जागृत झाला मंत्र तुझा बलशाली
सळसळणार्‍या रक्तामधुनी फुलल्या लाख मशाली
दिशादिशातून तुझ्या यशाच्या लखलखती ज्योती

मुठी-मुठीतून तूच घडविली परक्रमाची गाथा
एकजुटीने भंगलास तू अन्यायाचा ताठा
मांडिलेस तू अपूर्व तांडव इथल्या जनतेसाठी

तव तेजाने उजळून उठली इतिहासाची पाने
कालचक्र हे अखंड गाईल तुझ्या किर्तीचे गाणे
पिढ्या-पिढ्यांना स्फूर्ती देईल धगधगती क्रांती
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 ९)    🌀🌀 बोधकथा 🌀🌀
        ================
$ जीवनाचे रहस्य $

एकदा एका कसायाकडे त्‍याचा एक मित्र त्‍याला भेटण्‍यासाठी गेला होता. तिथे त्‍याने असे पाहिले की, एका मोठ्या पिंज-यात खूप असे बोकड, मेंढ्या कैद आहेत आणि एकमेकांशी मस्‍ती करत आहेत. मोठ्या आनंदात ते प्राणी आहेत. दुसरीकडे त्‍याने असे पाहिले की त्‍याच पिंज-यातून एकेक बोकड काढून तो कसाई कापत आहे आणि त्‍याचे मांस विकत आहे. कसायाच्‍या मित्राला ही गोष्‍ट पाहून कसेतरी वाटले. तो त्रस्‍त झाला कारण ज्‍यावेळी प्रत्‍येक बोकडाला कसाई बाहेर काढून कापत असे हे जाळीतून पिंज-यातल्‍या प्रत्‍येक बोकडाला दिसत होते पण तरीसुद्धा ते बोकड आपला कुणीतरी मित्र मरतो आहे याची जाणीव न ठेवता आनंदात कसे राहत होते याचे त्‍या मित्राला राहून राहून आश्‍चर्य वाटत होते. ते बोकड आपल्‍याच मस्‍तीत खेळत, बागडत, आनंदात त्‍या पिंज-यात राहतात कसे याचे त्‍या मित्राला कोडे पडले होते. शेवटी न राहवून त्‍याने त्‍या कसाई मित्राला याचे कारण विचारले असता कसाई म्‍हणाला,’’ अरे मित्रा, फार सोपे कारण आहे. मी त्‍या प्रत्‍येक बोकडाच्‍या कानात असे सांगितले आहे की, सगळे बोकड मेले तरी हरकत नाही पण मी तुला काही कापणार नाही. त्‍यामुळे तू आनंदात राहा. तू एकमेव बोकड असा असशील की जो शेवटपर्यंत जिवंत राहशील. त्‍यामुळे ते प्रत्‍येक बोकड हे आपण जिवंत राहणार या आनंदात आहे आणि हे त्‍याचमागचे रहस्‍य आहे.

तात्‍पर्य :-
   या पिंज-यातल्‍या बोकडासारखीच माणसाची अवस्‍था आहे. प्रत्‍येकालाच असे वाटत राहते की, मी शेवटपर्यंत जिवंत राहणार आहे पण कधी ना कधी आपला नंबर हा येणारच आहे. जीवन जगताना आपण याची निश्चितच जाणीव ठेवली पाहिजे की आपणही कधीतरी मरणार आहोत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१०)  💥 प्रेरणादायी विचार 💥
        ================
 घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयन्त केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
११)   🔳 सामान्य नान 🔳
        ==============
        $ डिसेंबर महत्वाचे दिन $
०१ डिसेंबर = जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर = आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर = आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर = नॊदल दिन
०७ डिसेंबर = ध्वज दिन
०८ डिसेंबर = जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर = मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर = राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर = किसान दिन
२४ डिसेंबर = राष्ट्रीय उपभोक्ता दिन
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१२)   💢थोरव्यक्ती परिचय💢
           ==============
🌹 राणी लक्ष्मीबाई 🌹
===============
🏻
🔵लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर,

 म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई,

(नोव्हेंबर १९,इ.स.१८३५-जून १७,इ.स. १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झाशीराज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७च्याब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्धझालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. यांच्या शौर्याने यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले.

    बालपण लक्ष्मीबाईंचे मूळ नावमणिकर्णिका तांबेहोते. यांचे वडीलमोरोपंत तांबेहे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचेसाताराजिल्ह्यातील होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटीउत्तर प्रदेशातीलकाशीयेथे झाला होता.व्यक्तिमत्त्वधोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या.

  अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणार्या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंतनानासाहेब पेशवे,जयाजी शिंदेव लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातील प्रत्येक विद्येत प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठीमल्लखांबनावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणार्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या........
                              -
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
         ✒✏▪संकलन▪✏✒
🌟सतिष बोरखडे दारव्हा जिल्हा यवतमाळ        💥📱7875840444📱💥
  💻💻महाराष्ट्र अॅडमीन पॅनल💻💻
🔵💢💢💥🙏🙏💥💢💢🔵

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा