📖📖📖📖📖📖📖📖📖📖
📕📕📕📕📕📕📕📕📕📕
♢♢♢ परीपाठ ♢♢♢
●●□□♤♤☆▪☆♤♤□□●●
¤¤दिनांक :- 27/11/2015¤¤
▪☆वार - शुक्रवार☆▪
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌀🇮🇳🌟 राष्ट्रगीत 🌟🇮🇳🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌀🔶🌟 प्रतिज्ञा 🌟🔶🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌀🇮🇳🌟 संविधान 🌟🇮🇳🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१) 🔷 आजचे पंचाग 🔷
=============
27/शुक्रवार
कृष्ण पक्ष द्वितियानक्षत्र : मृगशीर्ष
योग : सिद्धि
करण : तैतिल
सूर्योदय : 06:52
सूर्यास्त : 17:59
➖➖➖➖➖➖➖➖➖
२) 🔶 सुविचार 🔶
===========
कोणतीही बिकट परिस्थिती आली तरी धीर सोडता कामा नये.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
३) 🔷 म्हणी व अर्थ 🔷
=============
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
– आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
४) 🔶 सुभाषित 🔶
===========
सेवाधर्मः परमगहनो योगिनामप्यगम्यः ।
$ अर्थ :-
दुसर्यांची सेवा करणे हे फार कठिण काम आहे. मोठमोठ्या योग्यांना देखिल हे दुःसाध्य आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
५) 💥 दिनविशेष 💥
============
२७ नोव्हेंबर शुक्रवार
हा या वर्षातील ३३१ वा दिवस आहे.
$ महत्त्वाच्या घटना $
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
१९९५ : पाँडेचरीमधील ’व्हेक्टर कन्ट्रोल रिसर्च सेन्टर’ मधील शात्रज्ञांनी शोधलेले ’थोम्ब्रिनेज’ हे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले. अमेरिकेने या औषधाचे पेटंट मंजूर केले.
१९९५ : गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर
१९४४ : दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या स्टॅफोर्डशायर येथील शस्त्रसाठ्यात स्फोट होऊन ७० जण ठार झाले.
*जन्मदिवस / जयंती / वाढदिवस*
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
१९८६ : सुरेश रैना – क्रिकेटपटू
१९४० : ब्रूस ली – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ (मृत्यू: २० जुलै १९७३)
१९१५ : दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. मोकाशी – साहित्यिक, नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ’फॉर हूम द बेल टोल्स‘ या कादंबरीचा ’घणघणतो घंटानाद’ हा त्यांनी केलेला अनुवाद उल्लेखनीय आहे. (मृत्यू: २९ जून १९८१)
१९०७ : हरिवंशराय बच्चन – हिन्दी कवी (मृत्यू: १८ जानेवारी २००३)
१८८१ : डॉ. काशीप्रसाद जायस्वाल – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ (मृत्यू: ४ ऑगस्ट १९३७)
१८७४ : चेम वाइझमॅन – इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९५२)
१८७० : दत्तात्रय बळवंत तथा द. ब. पारसनीस – इतिहास संशोधक
*मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन*
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
२००८ : विश्वनाथ प्रताप सिंग – भारताचे ७ वे पंतप्रधान, केन्द्रीय अर्थमंत्री व संरक्षणमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंडा संस्थानचे ४१ वे राजे (जन्म: २५ जून १९३१)
२००० : बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर – साहित्यिक, संशोधक, ’दैनिक गोमंतक’चे पहिले संपादक (जन्म: २६ मार्च १९०९)
१९९४ : दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित – स्वातंत्र्यसेना
===========================
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
६) ⭕ स्फुर्तिगीत ⭕
============
$ सत्य शिवाहुन सुंदर हे $
दान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे
सत्य शिवाहुन सुंदर हे
इथे मोल ना दामाचे, मोती होतिल घामाचे
सरस्वतीच्या प्रेमाचे प्रतीक रम्य शुभंकर हे
चिराचिरा हा घडवावा, कळस कीर्तिचा चढवावा
अज्ञानी तो पढवावा, थेंब आम्ही तर सागर हे
त्यागाला या नाव नसे, पुण्यवान हा देश असे
कल्पतरू हा उभा दिसे, त्या छायेतील मंदिर हे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
७) ⭕ देशभक्ती गीत ⭕
==============
$ जिंकू किंवा मरू $
माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू
जिंकू किंवा मरू
लढती सैनिक, लढू नागरिक
लढतील महिला, लढतील बालक
शर्थ लढ्याची करू
देश आमुचा शिवरायाचा
झाशीवाल्या रणराणीचा
शिर तळहाती धरू
शस्त्राघाता शस्त्रच उत्तर
भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू
हानी होवो कितीहि भयंकर
पिढ्यापिढ्या हे चालो संगर
अंती विजयी ठरू
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
८) 💢🙏 प्रार्थना 🙏💢
==============
$ शुद्धी दे बुद्धी दे $
शुद्धी दे, बुद्धी दे, हे दयाघना
शक्ती दे, मुक्ती दे आमुच्या मना
तरतम ते उमजेना, उमजेना सत्य
फसविते आम्हांला विश्व हे अनित्य
दिग्दर्शन मज व्हावे हीच कामना
स्वत्वाला विसरून जर भ्रमले हे चित्त
ऋजुतेवर मात करी द्रोह हा प्रमत्त
निर्भयता जागावी हीच प्रार्थना
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
९) 🌀🌀 बोधकथा 🌀🌀
================
$ प्रामाणिक मुलगा $
एक मुलगा खूपच सरळमार्गी आणि प्रामाणिक होता. त्याच्यावर त्याच्या आईवडीलांनी चांगले संस्कार केले होते व त्या संस्कारांना अनुसरुन तो वागत होता. एकदा काही निमित्ताने तो शेजा-याच्या घरी गेला. शेजारी कुठेतरी बाहेर गेला होता. शेजा-याच्या नोकराने मुलाला बसायला सांगितले आणि नोकर निघून गेला. मुलगा जिथे बसला होता तिथे जवळ एका टोपलीत उत्तम दर्जाची सफरचंदे ठेवली होती. त्या मुलालाही सफरचंद खूप आवडत असत पण त्याने त्यांना हात लावला नाही. तो शेजा-याची वाट पाहात बसला होता. ब-याच वेळाने शेजारी घरी परतला त्याने पाहिले की मुलगा बसला आहे व त्याच्याशेजारी सफरचंदे असूनही तो त्यांना हातसुद्धा लावत नाही. मुलाला सफरचंद खूप आवडतात हे शेजा-याला माहित होते. शेजारी येताच मुलाने उठून नमस्कार केला, शेजा-याने त्याला जवळ घेतले व विचारले,''तुला सफरचंद तर खूप आवडतात ना, मग तरीसुद्धा एकही सफरचंद उचलून का खाल्ले नाहीस'' मुलगा म्हणाला,'' इथेच कोणीच नव्हते, मी दोन तीन सफरचंदे जरी उचलून घेतली असती तरी कुणालाच कळले नसते, कोणीच मला पाहात नव्हते पण कोणी पाहत नव्हते पण मी स्वत:ला ते पाहात होतो. परंतु मी स्वत:ला फसवू शकत नाही.'' शेजा-यास त्याच्या या बोलण्याचा आनंद वाटला. त्याने त्याला शाबासकी दिली व म्हणाला,'' आपण करतो ते आपला आत्मा पाहात असतो, आपण आपल्याला कधीच फसवू शकत नाही. दुस-याला लाख फसवू पण स्वत:शी खोटे बोलणे फार अवघड आहे. सर्वांनीच तुझ्यासारखे वर्तन केल्यास जग सुखी होईल.''
तात्पर्य :-
लहानपणीच मुलांना खोटे वागणे, बोलणे यापासून दूर ठेवल्यास मुले भविष्यात योग्य वर्तन करतील. वाईट गुण घेण्यास क्षणाचाही विलंब लागत नाही पण चांगले शिकण्यास खूप काळ जावा लागतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१०) 💥 प्रेरणादायी विचार 💥
================
घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयन्त केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
११) 🔳 सामान्य नान 🔳
==============
१) पेशवाईचा शेवट कोणत्या वर्षी झाला?
२) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते?
३) भारताचे पहिले ब्रिटीश गव्हर्नर कोण?
=======================
उत्तरे :
१) १८१८ मध्ये
२) बद्रुदीन तैयबजी
३) वॉरन हेस्टिंग्ज
========================
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१२) 💢थोरव्यक्ती परिचय💢
==============
$ लालबहादूर शास्त्री $
================
*2 रे भारतीय पंतप्रधान*
कार्यकाळ:-
जुन ९, इ.स. १९६४ – जानेवारी ११, इ.स. १९६६
*३ रे भारतीय परराष्ट्रमंत्री*
कार्यकाळ:-
जुन ९, इ.स. १९६४ – जुलै १७, इ.स. १९६४
जन्म :-- ऑक्टोबर २, इ.स. १९०४
मुगलसराई, भारत
मृत्यू :-- जानेवारी ११, इ.स. १९६६
ताश्केंत
राजकीय पक्ष :-- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी :-- ललिता देवी
धर्म :-- हिंदू
*लालबहादूर शास्त्री*
(२ ऑक्टोबर, इ.स. १९०४ - ११ जानेवारी, इ.स. १९६६)
हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हियेत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद (तत्कालीन सोव्हियेत संघात, वर्तमान उझबेकिस्तानात) येथे दौऱ्यावर असताना ११ जानेवारी, इ.स. १९६६ रोजी यांचा हृदयविकाराचे दोन झटके येऊन मृत्यू झाला
♧♢♡♤♧♢♡♤♧♢♡♤♧♢♡♤

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा