पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०१५

दिनांक :- 26/11/2015


🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
    🌀💢💢 परीपाठ 💢💢🌀
🔳🔳🔲🔲🔘🔘🔲🔲🔳🔳
🔹🔹दिनांक :-  26/11/2015🔹🔹
       🔸🔸वार -  गुरुवार🔸🔸
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
      🌀🇮🇳🌟 राष्ट्रगीत 🌟🇮🇳🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
      🌀🔶🌟 प्रतिज्ञा 🌟🔶🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌀🇮🇳🌟 संविधान 🌟🇮🇳🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१)    🔷 आजचे पंचाग 🔷
        =============
26/गुरुवार
कृष्ण पक्ष प्रतिपदानक्षत्र : रोहिणी
योग : शिव
करण : बलव
सूर्योदय : 06:52
सूर्यास्त : 17:59
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
२)    🔶 सुविचार 🔶
       ===========
व्यक्तिच्या मनात वसत असलेला सलोखा गुण्यागोंविदाने राहणा-या समाजाला प्रतिबिंबीत करीत असतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
३)    🔷 म्हणी व अर्थ  🔷
        =============
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही
      – कष्टाशिवाय यश मिळत नाही
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
४)    🔶 सुभाषित 🔶
       ===========
गुणाः पूजास्थानं गुणिषु न च लिंगं न च वयः ।
         $ अर्थ :-
गुणांची जाण असलेल्यांना गुण हेच पूजास्थानी असतात. ते व्यक्तीचे वय अथवा ती स्त्री कि पुरुष ते पहात नाहीत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
५)   💥 दिनविशेष 💥
       ==========
हा या वर्षातील ३३० वा  दिवस आहे.
 आज २६ नोव्हेंबर :--  "संविधान दिन"

*महत्त्वाच्या घटना*
============

२००८ : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना ’लष्कर-ए-तैय्यबा’ने मुंबईत ठिकठिकाणी अतिरेकी हल्ले केले.
१९९९ : विकीरण जीवशास्त्र (Radiation Biology) या विषयात महत्त्वपूर्ण संशोधन केल्याबद्दल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) तर्फे जैववैद्यकीय संशोधनासाठी देण्यात येणार्‍या पुरस्कारासाठी डॉ. रावसाहेब काळे यांची निवड करण्यात आली.
१९९७ : अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून देणारे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि पंतप्रधानांचे विज्ञानविषयक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर
१९६५ : अ‍ॅस्टॅरिक्स (A-1) हा फ्रान्सचा पहिला उपग्रह अल्जीरीयातून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला.
१९४९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.

*जन्मदिवस / जयंती / वाढदिवस*
=====================
१९७२ : अर्जुन रामपाल – अभिनेता
१९५४ : वेल्लुपल्ली प्रभाकरन – एल. टी. टी. ई. चा संस्थापक (मृत्यू: १८ मे २००९)
१९३९ : टीना टर्नर – अमेरिकन/स्विस गायिका, अभिनेत्री व नर्तिका
१९२३ : राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर – चित्रपट दिग्दर्शक (बोलविता धनी, मी तुळस तुझ्या अंगणी, माझं घर माझी माणसं, घरचं झालं थोडं, गजगौरी, जख्मी) (मृत्यू: २८ जुलै १९७५ - मुंबई)
१९२१ : व्हर्गिस कुरियन – भारतीय दुग्धोत्पादनातील ’धवल क्रांती’चे जनक, ’अमूल’चे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे पारितोषिक विजेते (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१२ - नडियाद, गुजराथ)
१८९० : सुनीतिकुमार चटर्जी – आधुनिक ऐतिहासिक भाषाशास्त्र व ध्वनीविचार यांच्या अभ्यासाची मुहूर्तमेढ रोवणारे भाषाशास्त्रज्ञ,

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
६)    ⭕ स्फुर्तिगीत ⭕
      ============
$ हे राष्ट्र देवतांचे $

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची
रामायणे घडावी येथे पराक्रमाची
शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे

येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे

येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा
येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
हे क्षेत्र पुण्यदायी भगवन्‌ तथागताचे

हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे
सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे
येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे

येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळीचा पायाच 'सत्य' आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
७)    ⭕ देशभक्ती गीत ⭕
       ==============
$ देश हीच माता $

देश हीच माता, देश जन्मदाता
घडो देशसेवा ऐसी बुद्धी दे अनंता

धर्म पंथ नाही आम्हां जात-गोत नाही
मुले माणसाची अम्ही, वंश माणसाई
मनी आमुच्या ना काही न्यूनता, अहंता

खुली ज्ञान-विज्ञानाची, कलांची कवाडे
सुखे लाभ घेऊ त्यांचा शिकू रोज थोडे
उद्या उंच होऊ आम्ही धरू योग्य पंथा

विस्मरू न अम्ही केव्हा ध्येय, देशनिष्ठा
नव्या भारताला देऊ जगी या प्रतिष्ठा
सर्वसाक्षी सर्वागत तू आम्हां यशोदाता
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
८)    💢🙏 प्रार्थना 🙏💢
        ==============
$ तिमिरातुनी तेजाकडे $

तिमिरातुनी तेजाकडे
ने दीपदेवा जीवना ॥

ज्योतीपरी शिवमंदिरी
रे जागवी माझ्या मना ॥

दे मुक्तता, भयहीनता
अभिमान दे, दे लीनता
दे अंतरा शुभदायिनी
मलयनिलासम भावना ॥
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 ९)    🌀🌀 बोधकथा 🌀🌀
        ================
$ संत राबिया आणि चोर $
       
संत राबियाची ईश्‍वरभक्‍ती प्रसिद्ध आहे. ती मनोभावे ईश्‍वराचे स्‍मरण करत असे. प्राणीमात्रांना ईश्‍वरनिर्मिती मानून त्‍यांची सेवा करत असे. एका रात्री ती निद्रिस्‍त असताना तिच्‍या घरात चोर घुसला. त्‍याला राबियाच्‍या घरी धन तर सापडणार नव्‍हते. त्‍याने खूप शोधाशोध केली. पण हाती काहीच लागले नाही. त्‍याने समोर पडलेली चादर उचचलली. चादर घेऊन तो जात असताना त्‍याला एकाएकी चक्कर आली, डोळ्यांना अंधारी आली, काही दिसेनासे झाले, त्‍याने डोळे चोळून पाहण्‍याचा प्रयत्‍न केला पण त्‍याचा काहीच फायदा झाला नाही. त्‍याने तेथेच बैठक मारली आणि चादर बाजूला ठेवून डोक्‍याला थोपटून पाहिले. तेव्‍हा त्‍याला बरे वाटले. चादर उचलून तो चालू लागला की तेव्‍हा पुन्‍हा त्‍याची तीच अवस्‍थ झाली. चादर खाली ठेवली की त्‍याला बरे वाटत असे. तो हैराण झाला. तेव्‍हा त्‍याला कोणीतरी म्‍हटल्‍याचा भास झाला,’’ तू स्‍वत:ला का अडचणीत टाकतो आहेस, राबियाने स्‍वत:चे अस्तित्‍व माझ्याकडे सोपवून दिले आहे. जेव्‍हा एक मित्र झोपतो तेव्‍हा दुसरा जागा असतो. मग त्‍याची कोणतीही वस्‍तू चोरीला जात असताना मी शांत कसा बसेन’’ चोराने तेथे निद्रिस्‍त असलेल्‍या राबियाचे चरणस्‍पर्श करून दर्शन घेतले व तिची चादर तेथेच टाकून तो निघून गेला.

तात्‍पर्य :-ईश्‍वराशी आपण एकरूप झालो की ईश्‍वरही आपली मनापासून काळजी करतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१०)  💥 प्रेरणादायी विचार 💥
        ================
शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
११)   🔳 सामान्य नान 🔳
        ==============
* पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
* गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
* गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
* जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
* औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१२)🔘संविधान दिन विषेश माहीती🔘
     ■■■■■■■■■■■■■■■■■■

१९५० साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे. १९३५सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट अॅटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्याकल्पनेस भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शविली होती. १९४६च्या उन्हा़ळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक डिसेंबर ९ १९४६ रोजीसच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे पार पडली. ऑगस्ट १५ १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधीरूपात काम केले होते.

ऑगस्ट २९ १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो.[१].नागरिकत्व, निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने जानेवारी २६ १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस "भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला
♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा