प्रश्न वाचा उत्तर सांगा
एका अंधा-या रात्री चार माणसांना एक पूल ओलांडायचा आहे. त्यांच्यापाशी एकच विजेरी आहे आणि एकावेळी केवळ दोन माणसांचे वजन पेलण्याची पुलाची क्षमता आहे. त्या चार माणसांना पूल ओलांडायला अनुक्रमे 1, 2, 5 व 8 मिनिटे लागतात. दोन भिन्न वेगाची माणसे एकत्र पुल ओलांडत असतील तर त्यातील कमी वेगाच्या माणसाचा वेळ मोजायला पाहिजे. तर कमीत कमी किती वेळात सर्वजण पुलाच्या पार जाउ शकतील? (इन्फोसिस रिक्रुटमेंट परीक्षेतील प्रश्न)
- सर्वप्रथम 1 व 2 मिनिटे वेळ लागणारी माणसे पलिकडे जातील.
- दोघांना पुल ओलांडायला लागली 2 मिनिटे.
- आता 1 मिनिट लागणारा माणूस परत आला, झाली 3मिनिटे.
- आता 5 व 8 मिनिटे वेळ लागणारी माणसे पलिकडे गेली, झाली 11 मिनिटे.
- 2 मिनिटे लागणारा माणूस परत आला, झाली 13 मिनिटे.
- 1 मिनिट लागणारा माणूस व 2 मिनिटे लागणारा माणूस पलिकडे गेले, 15 मिनिटे.
- यात 5 व 8 मिनिटे लागणा-या माणसांना एकत्र जायला लावण्यात प्रश्नाची किल्ली आहे.
- संकलन
- श्री प्रमोद दिगंबर मोरे
- 9404566070
- रा जि प शाळा चरई बुद्रुक
- ता तळा जि रायगड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा