📚📚📚📚📚📚📚📚
माझी शाळा माझे उपक्रम
🏕दहीहंडी 🏕
रा.जि.प.शाळा चरई बु. ता.तळा जि.रायगड
📝अहवाल लेखन 📝
श्री.प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
प्राथ.शिक्षक
रा.जि.प.शाळा चरई बु.ता.तळा जि.रायगडा
दि.२५/०८/२०१६ रोजी गोपाळकाला हा सण गावोगावी उत्साहात साजरा करण्यात आला.या दिवशी शाळेला सुट्टी असल्यामुळे आमच्या शाळेत हा सण आज दि २६/०८/२०१६ रोजी ठिक ४ः३० ते ५ः ०० या वेळेत साजरा करण्यात आला.
बुधवार दि २४/०८/२०१६ रोजी मुलांना आजच्या कार्यक्रमासंबंधी दिलेल्या पूर्व सूचनेनुसार मुले येताना सर्व तयारी करून आले. प्रत्येक मुलाने दहीहंडीसाठी त्यांना ज्या उपलब्ध होतील त्या वस्तू ते घेऊन आले. दहीहंडीसाठी लागणारे दही , दूध , फळे , मडके इ. वस्तू घेऊन आले.
दुपारनंतर ठिक ४ः३० वा. सर्व मुले त्यांनी आणलेल्या साहित्यासह शाळेच्या प्रांगणात जमा झाले. त्यानंतर मी व इतर पालक यांच्या मदतीने दहीहंडी बांधण्यात आली.त्यानंतर मुलांनी मनसोक्तपणे गोविंदा रे गोपाला ........ अशा पध्दतीने गाणे गात गोविंदा खेळला. शेवटी सर्वप्रथम मुलींनी दोन थरांची सलामी दिली. त्यानंतर मुलांनी दोन थरांची सलामी देऊन दहीहंडी फोडली.
शेवटी सर्व मुलांना दहीहंडीचा काला व चाॕकलेट देऊन आजच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा