मकरसंक्रांत
मकरसंक्रांत हा भारतातील एक शेतीसंबंधितसण आहे.
सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातूनउत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीलामकरसंक्रांत साजरी केली जाते.
या दिवशीसूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते.
पृथ्वी वरुन पाहिले असता,सुर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.
(अयन=चलन/ढळणे) हा सण भारत सरकारने राष्ट्रीय सण म्हणून घोषित केला आहे.makar sankran in English
महाराष्ट्रातील संक्रांत
महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात.
यास भोगी (सामान्यतः १३ जाने),संक्रांती (सामान्यतः १४ जाने) व किंक्रांती(सामान्यतः १५ जाने) अशी नावे आहेत.
संक्रांतीस आप्तस्वकीयांना तिळगुळ आणिवाणवाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते.
विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात. इंग्लिशमहिन्यानुसार हा दिवस १४ जानेवारी रोजी येतो. परंतु दर ७० वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते.
मूळ
उत्तरायण शब्द, दोन संस्कृत शब्द उत्तर(उत्तर दिशा) व अयन(अंतराळातील मार्ग) या शब्दांचा संधी आहे.
प्रादेशिक विविधता

पूर्व भारतातील संक्रांत
संक्रात समग्र दक्षिण पूर्व आशिया मध्ये थोडा स्थानिक फेरफार सोबत साजरी करतात.
उतर भारतात,हिमाचल प्रदेश - लोहडी अथवा लोहळी,(Lohri)
पंजाब - लोहडी अथवा लोहळी, (Lohri)
पूर्व भारतात,बिहार - संक्रान्तिआसाम - भोगाली बिहु, (Bhogali Bihu)पश्चिम बंगाल - मकर संक्रान्तिओडिशा - मकर संक्रान्तिपश्चिम भारतात,गुजरात व राजस्थान - उतरायण(पतंगनो तहेवार) (पतंगांचा सण)
गुजरातमध्ये या दिवशी धान्य,तळलेल्या मिठाया, खाद्यपदार्थ बनावले व दान केले जातात. गुजरातेत या दिवशी गहू, बाजरीयांच्या खिचड्या बनवल्या जातात.
दक्षिण [[भारत],कर्नाटक, आंध्र प्रदेश - (संक्रांति)तमिळनाडू - पोंगल, (Pongal)शबरीमला मंदिरात मकर वल्लाकु उत्सव.भारताचे अन्य भागात मकर संक्रान्तिनेपाळमध्ये,थारू (Tharu) लोक - माघीअन्य भागातमाघ संक्रान्ति (Maghe Sankranti) के माघ सक्राति (Maghe Sakrati)थायलंड - सोंग्क्रान (สงกรานต์Songkran)लाओस - पि मा लाओ (Pi Ma Lao)म्यानमार - थिंगयान (Thingyan)
धार्मिक अर्थ

मकर संक्रांती पासून उन्हाळ्याची सुरूवात होते.
पृथ्वीचा उत्तर गोलार्धात प्रवेश होतो. हिंदू श्रद्धेनुसार सूर्य प्रत्यक्ष ब्रह्मतत्त्वाचे रूप आहे, जे एक, अद्वैत, स्वयं प्रकाशमान, दैवत्वाचे प्रतिक आहे.
यात्रा
मकरसंक्रांतीस अनेक यात्रा आयोजित होतात, यात सर्वात प्रमुख म्हणजे प्रख्यात कुंभमेळा जो दर बारा वर्षांनी हरिद्वार, प्रयाग, उज्जैन वनासिक अशा चार जागी चक्राकार पद्धतीने आयोजित होतो.
याखेरिज गंगासागर येथे,कोलकाता शहरानजिक गंगा नदी जेथेबंगालच्या उपसागरास मिळते तेथे गंगासागर यात्रा आयोजित केली जाते.
केरळच्याशबरीमला येथे मकरज्योतीचे दर्शन घेण्यास या दिवशी अनेक भाविकांची गर्दी होते.
पुराणातील उत्तरायण
महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक भीष्म ज्यांना इच्छामरणाचे वरदान होते, त्यांनी बाणांच्या शय्येवर पडून राहून या दिवशी देह त्याग केल्याचे सांगितले जाते. हिंदू परंपरेत उत्तरायणाचा कालावधी दक्षिणायनापेक्षा शुभ मानला जातो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा