💻💻महाराष्ट्र अॅडमीन पॅनल💻💻
====💻===Ⓜ🅰🅿===💻===
Ⓜ🅰🅿 परीपाठ Ⓜ🅰🅿
****************
🔳🔳दिनांक :- 31/12/2015🔳🔳
🔘🔘 वार - गुरुवार 🔘🔘
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌀🇮🇳🌟 राष्ट्रगीत 🌟🇮🇳🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌀🔶🌟 प्रतिज्ञा 🌟🔶🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌀🇮🇳🌟 संविधान 🌟🇮🇳🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१) 🔹 आजचे पंचाग 🔹
====💻==Ⓜ🅰🅿==💻====
. ~ :: 31 :: गुरुवार :: ~
कृष्ण पक्ष षष्ठीनक्षत्र : पूर्वफाल्गुनी
योग : आयुष्यमान
करण : गर
सूर्योदय : 07:11
सूर्यास्त : 18:11
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
२) ▪ सुविचार ▪
==============
31. व्यक्तिच्या मनात वसत असलेला सलोखा गुण्यागोंविदाने राहणा-या समाजाला प्रतिबिंबीत करीत असतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
३) 🔸 म्हणी व अर्थ 🔸 ====💻==Ⓜ🅰🅿==💻====
31. कोल्हा काकडीला राजी
– लहान माणसे थोड्या गोष्टीने
संतुष्ट होतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
४) ▪ सुभाषित ▪
=============
31. विद्याधनं सर्वधनप्रधानम् ।
$ अर्थ :--
विद्याधन हे सर्व धनांमध्ये श्रेष्ठ होय.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
५) 🔹 दिनविशेष 🔹
====💻==Ⓜ🅰🅿==💻====
. ~: ३१ डिसेंबर :: गुरुवार :~
हा या वर्षातील ३६५ वा दिवस आहे.
~$ महत्त्वाच्या घटना $~
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*२००४ : त्याकाळी जगात सर्वात उंच असलेल्या (१६७० फूट), तैपेइ - १०१ या इमारतीचे उद्घाटन झाले.
*१९९९ : बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
*१९९९ : पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.
*१९४४ : दुसरे महायुद्ध - हंगेरीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
*१८७९ : थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले.
*१८०२ : इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात वसईचा तह झाला या तहात पेशव्यांचा बराच भूभाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला.
*१६०० : ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना
$ जन्मदिवस / जयंती / वाढदिवस $
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*१९४८ : डोना समर – अमेरिकन गायिका (मृत्यू: १७ मे २०१२)
*१९१० : पं. मल्लिकार्जुन मन्सूर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, पद्मविभूषण व कालिदास सन्मान आदी मानसन्मान त्यांना मिळाले. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९९२)
*१८७१ : गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव – आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक, ‘कन्या आरोग्य मंदिरा’चे संस्थापक, बडोद्याचे मल्लविद्या विशारद (मृत्यू: २५ मे १९५४)
$ मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन $
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*१९९७ : ’स्वरराज’ छोटा गंधर्व (जन्म: १० मार्च १९१८)
*१९८६ : राजनारायण – केंद्रीय आरोग्य मंत्री
*१९७१ : डॉ. विक्रम साराभाई – भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार (जन्म: १२ ऑगस्ट १९१९)
*१९२६ : वि. का. राजवाडे – इतिहासाचार्य (जन्म: १२ जुलै १८६३)
==========================
🚦सतिष बोरखडे दारव्हा 7875840444
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
६) ⭕ स्फुर्तिगीत ⭕
============
31. $ हे राष्ट्र देवतांचे…!!! $
~~~~~~~~~~~~~~~
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावेa, हिमवंत पर्वताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नको निराशा, थोडया पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जन शासनातळीचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
७) ⭕ देशभक्ती गीत ⭕ ====💻==Ⓜ🅰🅿==💻====
31. $ ते देशासाठी लढले $
~~~~~~~~~~~~~~
ते देशासाठी लढले
ते अमर हुतात्मे झाले !
सोडिले सर्व घरदार
त्यागिला मधुर संसार
ज्योतीसम जीवन जगले
ते देशासाठी लढले !
तो तुरुंग, ते उपवास
ते साखळदंड तनूस
कुणि फासावरती चढले
ते देशासाठी लढले !
झगडली-झुंजली जनता
मग स्वतंत्र झाली माता
हिमशिखरी ध्वज फडफडले
ते देशासाठी लढले !
कितिकांनि दिले प्राणास
हा विसरु नका इतिहास....
पलित्याची ज्वाला झाले
ते देशासाठी लढले !
हा राष्ट्रध्वज साक्षीला
करु आपण वंदन याला
जयगीत गाउया अपुले
ते देशासाठी लढले !
➖➖➖➖➖➖➖➖➖
८) ▫🙏 प्रार्थना 🙏▫
==============
31. $ शुद्धी दे बुद्धी दे $
~~~~~~~~~~~~~
शुद्धी दे, बुद्धी दे, हे दयाघना
शक्ती दे, मुक्ती दे आमुच्या मना
तरतम ते उमजेना, उमजेना सत्य
फसविते आम्हांला विश्व हे अनित्य
दिग्दर्शन मज व्हावे हीच कामना
स्वत्वाला विसरून जर भ्रमले हे चित्त
ऋजुतेवर मात करी द्रोह हा प्रमत्त
निर्भयता जागावी हीच प्रार्थना
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
९) ▫▪ बोधकथा ▪▫
====💻==Ⓜ🅰🅿==💻====
31. $ साधू आणि यक्ष $
******************
एक साधू तपश्चर्येस एका निर्जन स्थळी बसले होते. त्या ठिकाणी एका यक्षाचे वास्तव्य होते. या गोष्टीची साधूला कल्पना नव्हती. ते जेव्हा तेथे पोहोचले तेव्हा निर्जन स्थान पाहून त्यांनी तेथेच ध्यानधारणा सुरु केली. त्या वेळी यक्ष तेथे नव्हता. रात्री जेव्हा यक्ष तेथे आला तेव्हा आपल्या जागेवर दुस-यास व्यक्तीला पाहून त्याला राग आला. त्याने मोठ्याने आरडाओरड सुरु केली, पण समाधी अवस्थेत असलेल्या साधूवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. यक्षाने मग हत्तीचे रूप घेऊन त्यांना भीती दाखविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते ध्यानस्थ असल्याने त्यांच्यावर याचा काहीच परिणाम झाला नाही. मग यक्षाने वेगवेगळी रूपे घेऊन साधूला घाबरविण्याचा प्रयत्न केला. कधी तो वाघ, सिंह, तरस, कोल्हा अशा जंगली प्राण्यांची रूपे घेतली तरी साधूच्या ध्यानात काहीच खंड पडेना. शेवटी त्याने विषारी सापाचे रूप धारण करून त्यांना दंश केला तरीही त्यांच्यावर याचा काहीच परिणाम दिसेना. इतक्या प्रयत्नानंतरही साधूवर कोणताही परिणाम न झाल्याने यक्ष झालेल्या श्रमाने थकून सर्परूपातच विश्रांती घेऊ लागला. थोड्याच वेळात साधूंची समाधी अवस्था पूर्ण झाली व ते जागे झाले व त्यांची नजर सर्परूपी यक्षावर पडली. त्या नजरेत इतके प्रेमभाव भरलेले होते की त्या कृपादृष्टीने सापाच्या अंगातील विष अमृत बनले. यक्ष साधूंना शरण गेला व त्याने त्यांना आदरपूर्वक वंदन केले.
तात्पर्य – एकाग्रता, स्नेह आणि प्रेमभावनेने कोणावरही विजय प्राप्त करता येतो.ह
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१०) 🔸 प्रेरणादायी विचार 🔸
================
31. चांगल्या ज्ञानातून चांगल्या
विचारांचा उगम होतो,
चांगला विचार चांगल्या हेतूकडे नेतो, चांगला हेतू चांगल्या कृतीकडे नेतो,
चांगल्या कृतीमुळेच चांगली सवय लागते,
चांगल्या सवयीमुळे चांगला स्वभाव बनतो,
चांगल्या स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते आणि साध्य प्राप्त झाल्यामुळे आनंद मिळतो सुख मिळते.
म्हणजे चांगला विचारच सुखाची पहिली पायरी आहे...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
११) ▪▫सामान्य नान▫▪
================
31. $ महाराष्ट्र विशेष माहिती $
●●●●●●●●●●●●●●●●●●●
* महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.
* महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
* महाराष्ट्राची राजधानी - मुंबई
* महाराष्ट्राची उपराजधानी - नागपूर.
* महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.
* महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
१२) 🔹थोरव्यक्ती परिचय🔹 ====💻==Ⓜ🅰🅿==💻====
31. $ विक्रम साराभाई $
~~~~~~~~~~~~~~~
यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
........💐🙏💐........💐🙏💐........
दिव्यत्वाची जेथ प्रचीती
तेथे कर माझे जुळती ....
🙏🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏🙏
जन्म -- १२ ऑगस्ट, १९१९
मृत्यू -- ३१ डिसेंबर, १९७१ (वय ५२)
* विक्रम अंबालाल साराभाई *
(१२ ऑगस्ट, इ.स. १९१९ - ३१ डिसेंबर, इ.स. १९७१) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.
• कारकीर्द •
~~~~~~~~~~
१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. भारतात परत येउन त्यांनी नोव्हेंबर ११ १९४७ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळा ची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली. विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.
विक्रम साराभाई यांनी जागतिक किर्ती असलेल्या अनेक सस्थांची सुरवात केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (IIM) ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था डाॅ. साराभाई यांच्या प्रयत्नातुनच उभी राहिली. भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (PRL) देखिल डाॅ. साराभाई यांनीच सुरू केली. अहमदाबाद येथे वस्त्रोद्योग निर्मितीस चालना देणारे अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन (ATIRA) या संस्थेची उभारणी त्यांनी केली. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली सेंटर फॅार इन्व्हीरॅान्मेंटल प्लॅनिंग टेक्नॅालॅाजी (CEPT) ही संस्था देखिल त्यांनी उभारली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✒✏▪संकलन▪✏✒
🌟सतिष बोरखडे दारव्हा जिल्हा यवतमाळ 💥📱7875840444📱💥
💻💻महाराष्ट्र अॅडमीन पॅनल💻💻
Ⓜ🅰🅿🌅🙏🙏🌅Ⓜ🅰🅿

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा