पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

गुरुवार, २ जुलै, २०१५

आजचा दिनविशेष

हा या वर्षातील १८३ वा (लीप वर्षातील १८४ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००१:बिहारमधील चंपारण्य जिल्हयातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा जगातील सर्वात मोठा बौध्द स्तूप सापडला.
१९९४:चित्रकार जगदीश स्वामीनाथन यांची मध्यप्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड
१९८३:कल्पक्कम, तामिळनाडू येथील अणूऊर्जा केंद्र सुरू झाले.
१९७२:भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षर्‍या केल्या.
१९६२:रॉजर्स, आरकॅन्सास येथे पहिले ’वॉल मार्ट’ स्टोअर उघडले.
१९४०:सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले.
१८५०:बेंजामिन लेन या शास्त्रज्ञाला ’गॅस मास्क’चे अनेरिकन पेटंट बहाल
१८६५:’साल्व्हेशन आर्मी’ या सेवाभावी संस्थेची स्थापना

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९३०:कार्लोस मेनेम – अर्जेंटिनाचे ५० वे राष्ट्राध्यक्ष
१९२५:पॅट्रिक लुमूंबा – काँगोचे पहिले पंतप्रधान (मृत्यू: १७ जानेवारी १९६१)
१९२३:जवाहरलाल अमोलकचंद दर्डा – स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी (मृत्यू: ? ? ????)
१९२२:पिअर कार्डिन – फ्रेन्च फॅशन डिझायनर
१९०४:रेने लॅकॉस्त – फ्रेन्च लॉन टेनिस खेळाडू आणि ’पोलो’ टी शर्टचे जनक (मृत्यू: १२ आक्टोबर १९९६)
१८८०:गणेश गोविंद तथा ’गणपतराव’ बोडस – नट व गायक, ’गंधर्व नाटक मंडळी’चे एक संस्थापक (मृत्यू: २३ डिसेंबर १९६५)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०११:चतुरानन मिश्रा – केंद्रीय कृषी मंत्री, कामगार नेते, कम्युनिस्ट पक्षाचे नेते (जन्म: ७ एप्रिल १९२५)
२००७:दिलीप सरदेसाई – क्रिकेटपटू (जन्म: ८ ऑगस्ट १९४०)
१९९९:मारिओ पुझो – अमेरिकन लेखक (जन्म: १५ आक्टोबर १९२०)
१९६१:नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी आत्महत्या केली (जन्म: २१ जुलै १८९९)
१९५०:युसूफ मेहेर अली – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक व मुंबईचे महापौर (जन्म: २३ सप्टेंबर १९०३)
१८४३:डॉ. सॅम्यूअल हानेमान – होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक (जन्म:१० एप्रिल १७५५)
१७७८:रुसो – फ्रेन्च विचारवंत, लेखक व संगीतकार (जन्म: २८ जून १७१२)
१५६६:नोट्रे डॅम (Nostradamus) – प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता (जन्म:१४ डिसेंबर १५०३)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा