हा या वर्षातील १८४ वा (लीप वर्षातील १८५ वा) दिवस आहे.
महत्त्वाच्या घटना:
| २००६ | : | एक्स. पी. १४ हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळुन (साधारण चंद्राइतक्या अंतरावरुन) गेला. |
| २००१ | : | सुधीर फडके यांना राज्य सरकारचा ’गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर |
| २००० | : | विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात ऑयस्टर रॉकजवळ सागरी संग्रहालयात रुपांतर करण्यास नौदल, राज्यसरकार, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मच्छिमार प्रतिनिधींनी मान्यता दिली. |
| १९९८ | : | ’ए मेरे वतन के लोगो ...’ या प्रसिद्ध गाण्याचे कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर |
| १९३८ | : | 'मॅलार्ड' हे वाफेचे इंजिन ताशी १२६ मैल (२०२ कि. मी.) वेगाने न्यू कॅसलहून लंडनला पोहोचले. वाफेच्या इंजिनाचा हा वेगाचा विक्रम अजूनही अबाधित आहे. |
| १८९० | : | आयडाहो हे अमेरिकेचे ४३ वे राज्य बनले. |
| १८८६ | : | जर्मनीच्या कार्ल बेन्झ याने जगातील पहिली मोटारगाडी बनवली. |
| १८८४ | : | डाऊ जोन्स (DJIA) हा निर्देशांक सुरू झाला. |
| १८५५ | : | भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला. |
| १८५० | : | इस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातुन आणलेला ’कोहिनूर’ हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला. |
| १८५२ | : | महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली. |
| १६०८ | : | सॅम्यूअल बी. चॅम्पलेन यांनी कॅनडातील क्वेबेक शहराची स्थापना केली. |
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
| १९८० | : | हरभजनसिंग – भारतीय क्रिकेटपटू |
| १९७६ | : | हेन्री ओलोंगा – झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू |
| १९५१ | : | सर रिचर्ड हॅडली – न्यूझीलंडचे क्रिकेटपटू |
| १९२६ | : | सुनीता देशपांडे – लेखिका व स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: ७ नोव्हेंबर २००९) |
| १९२४ | : | सेलप्पन रामनाथन – सिंगापूरचे ६ वे राष्ट्राध्यक्ष |
| १९१४ | : | दत्तात्रय गणेश गोडसे – इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार (मृत्यू: ५ जानेवारी १९९२) |
| १९१२ | : | श्रीपाद गोविंद नेवरेकर – मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट (मृत्यू: १६ जून १९७७) |
| १९०९ | : | बॅरिस्टर व्ही. एम. तथा ’भाऊसाहेब’ तारकुंडे – कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ (मृत्यू: २२ मार्च २००४) |
| १८८६ | : | रामचंद्र दत्तात्रय तथा ’गुरूदेव’ रानडे – आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, फर्ग्युसन व विलींग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक (मृत्यू: ६ जून १९५७) |
| १८३८ | : | मामा परमानंद – पत्रकार व विचारवंत, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक (मृत्यू: १३ सप्टेंबर१८९३) |
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
| १९९६ | : | कुलभूषण पंडित तथा ’राजकुमार’ ऊर्फ ’जानी’ – जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता (जन्म: ८ आक्टोबर १९२६) |
| १९६९ | : | ब्रायन जोन्स – ‘द रोलिंग स्टोन्स‘चे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक (जन्म:२८ फेब्रुवारी १९४२) |
| १३५० | : | संत नामदेव यांनी समाधी घेतली. (जन्म: २९ आक्टोबर १२७०) |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा