पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

सोमवार, २० जुलै, २०१५

दिनविशेष दि 20/07/2015

हा या वर्षातील २०१ वा (लीप वर्षातील २०२ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२०००:अभिनेते दिलीपकुमार यांना ’राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार’ जाहीर
१९७६:मंगळाच्या पृष्ठभागावर प्रथमच व्हायकिंग -१ हे मानवरहित अंतराळयान उतरले.
१९७३:केनियाचे अर्थमंत्री ज्युलियस कियानो यांनी जाहीर केले की देशातील आशियाई लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील.
१९६९:अपोलो-११ या अंतराळयानातुन गेलेला नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला. त्यानंतर लगेच एडविन ऑल्ड्रिन चंद्रावर उतरला.
१९६०:सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी. भंडारनायके या अर्वाचीन जगातील प्रथम निर्वाचित स्त्री राष्ट्रप्रमुख बनल्या.
१९५२:फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक खेळांना सुरूवात झाली.
१९४९:इस्त्रायल व सीरीयाने शांतता करार केल्यामुळे १९ महिने सुरू असलेले युद्ध संपले.
१९४४:दुसरे महायुद्ध – क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन अ‍ॅडॉल्फ हिटलर बचावला.
१९२६:मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.
१९०८:बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने ’बँक ऑफ बडोदा’ ची स्थापना झाली.
१९०३:फोर्ड मोटर कंपनीतुन पहिली मोटारगाडी बाहेर पडली.
१८७१:ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला.
१८२८:’मुंबापूर वर्तमान’ हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.
१४०२:तैमूरलंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५०:नसिरुद्दिन शाह – चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक
१९२९:राजेंद्रकुमार – हिन्दी चित्रपट अभिनेता (मृत्यू:१२ जुलै १९९९)
१९१९:सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक (मृत्यू: ११ जानेवारी २००८)
१९२१:पंडित सामताप्रसाद – बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक, तबल्यातील अक्षरांचा कमालीचा सुस्पष्टपणा आणि त्याबरोबरच गोडवा, तबला - डग्ग्याच्या नादातील समतोल, बोलांच्या आकर्षकतेचा उत्कृष्ट अविष्कार आणि या सर्वांना व्यापून टाकणारी प्रासादिकता ही त्यांची वैशिष्ट्ये होती. (मृत्यू: ३१ मे १९९४)
१८३६:सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट – ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९२५ - केंब्रिज, केंब्रिजशायर, इंग्लंड)
१८२२:ग्रेगोर मेंडेल – जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ (मृत्यू: ६ जानेवारी१८८४)
ख्रिस्त पूर्व ३५६:अलेक्झांडर द ग्रेट – मॅसेडोनियाचा राजा (मृत्यू:११ जून ख्रिस्त पूर्व ३२३)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९५:शंकर काशिनाथ बोडस – पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक (जन्म: ४ डिसेंबर १९३५)
१९७३:ब्रूस ली – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ (जन्म: २७ नोव्हेंबर १९४०)
१९७२:गीता दत्त – अभिनेत्री आणि गायिका (जन्म: २३ नोव्हेंबर १९३०)
१९६५:बटुकेश्वर दत्त – क्रांतिकारक (जन्म: १८ नोव्हेंबर१९१०)
१९५१:अब्दूल्ला (पहिला) – जॉर्डनचा राजा (जन्म: ? फेब्रुवारी १८८२)
१९४३:वामन मल्हार जोशी – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक (जन्म: २१ जानेवारी१८८२)
१९३७:गुग्लिएल्मो मार्कोनी – रेडिओचे संशोधक (जन्म:२५ एप्रिल १८७४)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा