हा या वर्षातील १९८ वा (लीप वर्षातील १९९ वा) दिवस आहे.
महत्त्वाच्या घटना:
| २००४ | : | तामिळनाडुतील कुंभकोणम गावात एका शाळेला लागलेल्या आगीत ९० विद्यार्थी मृत्यूमुखी पडले. |
| २००० | : | अभिनेत्री व नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना’भरतनाट्य शिखरमणी’ पुरस्कार जाहीर |
| १९९४ | : | विश्वकप फूटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने इटालीला पेनल्टी शूटआऊटमधे हरवले. |
| १९९३ | : | तेलगू भाषेतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा 'तेलगू थल्ली' हा सर्वोच्च पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान |
| १९७६ | : | कॅनडातील मॉन्ट्रिअल येथे २१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. |
| १९५५ | : | वॉल्ट डिस्ने यांनी अॅनाहेम, कॅलिफोर्निया येथे ’डिस्नेलँड’ सुरू केले. |
| १९४७ | : | मुंबई ते रेवस अशी जलवाहतुक करणार्या ’रामदास’ या फेरीबोटीला गटारी अमावस्येच्या रात्री ’काशाचा खडक’ या ठिकाणाजवळ जलसमाधी मिळुन सुमारे ७०० लोक मृत्यूमुखी पडले. |
| १९१७ | : | किंग जॉर्ज (पाचवा) यांनी फतवा काढून जाहीर केले की त्यांच्या वंशातील पुरुष मंडळी ’विंडसर’ हे आडनाव लावतील. |
| १८४१ | : | अतिशय गाजलेल्या ’पंच’ या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. |
| १८१९ | : | ’अॅडॅम्स-ओनिस’ करारानुसार फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेने स्पेनकडुन ५ दशलक्ष डॉलर देऊन विकत घेतले. |
| १८०२ | : | मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले. |
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
| १९५४ | : | अँजेला मेर्केल – जर्मनीच्या चॅन्सेलर |
| १९३० | : | बाबुराव बागूल – दलित साहित्यिक (मृत्यू: २६ मार्च २००८) |
| १९१९ | : | स्नेहल भाटकर – संगीतकार (मृत्यू: २९ मे२००७) |
| १८८९ | : | अर्ल स्टॅनले गार्डनर – अमेरिकन लेखक आणि वकील (मृत्यू: ११ मार्च १९७०) |
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
| २०१२ | : | मृणाल गोरे – समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य (जन्म: २४ जून १९२८) |
| १९९२ | : | शांता हुबळीकर – प्रभातच्या ’माणूस’ चित्रपटामुळे गाजलेल्या अभिनेत्री, पुणे महापालिकेतर्फे ’बालगंधर्व पुरस्कार’ (जन्म: १४ एप्रिल १९१४) |
| १९९२ | : | काननदेवी – बंगाली व हिंदी चित्रपटातील अभिनेत्री व गायिका [१९३० ते १९५०] (जन्म:२२ एप्रिल १९१६) |
| १७९० | : | अॅडॅम स्मिथ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता (जन्म: ५ जून १७२३) |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा