पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

रविवार, ३१ जुलै, २०१६

आण्णा भाऊ साठे जयंती

*"तुकाराम भाऊराव साठे"*


*_अण्णा भाऊ साठे_*

*जन्म:-*
ऑगस्ट १, इ.स. १९२०

*जन्मस्थान*
वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली

*मृत्यू*
जुलै १८, इ.स. १९६९

राष्ट्रीयत्व:- भारतीय

नागरिकत्व:: भारतीय

तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे (ऑगस्ट १, इ.स. १९२० - जुलै १८, इ.स. १९६९)

हे मराठी लेखक व समाजसुधारक होते.

 वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे.

ग्रामीण ढंगातील रांगड्या तमाशाला 'लोकनाट्य` हे बिरुद शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी दिले [ संदर्भ हवा ].

अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्‍न केले.

 संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून निर्माण झालेल्या मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मितीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख व शाहीर कॉ. द.ना. गव्हाणकरांचे मोलाचे योगदान होते.

अण्णा भाऊ साठे हे अंतर्बाह्य मार्क्सवादी होते.

अण्णा भाऊ साठे म्हणजे जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व होते.

 वैयक्तिक दुःखांचा विचार न करता; आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर होते.

*लेखन:-*

अण्णा भाऊ साठे यांनी
३५ कादंबर्‍या,
८ पटकथा,
३ नाटके,
१ प्रवासवर्णन,
१३ कथासंग्रह,
१४ लोकनाट्ये,
१० प्रसिद्ध पोवाडे व
१२ उपहासात्मक लेख लिहिले.

बंगालचा दुष्काळ,
तेलंगण संग्राम,
पंजाब-दिल्लीचा पोवाडा,
 अंमळनेरचे हुतात्मे,
काळ्या बाजाराचा पोवाडा,
 ’माझी मैना’ हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील छक्कड,
 कामगार चळवळीवरील ‘एकजुटीचा नेता’ ते हिटलरच्या फॅसिझम विरोधात स्टॅलिनग्राडचा पोवाडा,
 बर्लिनचा पोवाडा,
चिनी क्रांतीवरील ‘चिनी जनांची मुक्तिसेना’ हे गौरवगान
आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गाजलेले ‘जग बदल घालुनी घाव-सांगुनी गेले भीमराव’ हे गाणे,

अशी अनेक गाणी, कवने, पोवाडे अण्णा भाऊ साठे यांनी रचले. त्यांनी आपल्या गाण्यांतून, पोवाड्यांतून अनेक सामाजिक, राजकीय प्रश्नांना, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय समस्यांना वाचा फोडण्याचे महान कार्य केले आहे.

*जीवन:-*

ऑगस्ट १, इ.स. १९२० रोजी सध्याच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी मांग कुटुंबात अण्णा भाऊ साठे यांचा जन्म झाला. हे गाव पूर्वी कुरुंदवाड संस्थानात होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते. या दांपत्याने जन्मलेल्या मुलाचे नाव तुकाराम ठेवले असले तरीही सर्वजण प्रेमाने त्याला अण्णा म्हणत.

अण्णा भाऊ साठे यांची दोन लग्ने झाली होती.
दुसर्‍या पत्‍नीचे नाव जयवंताबाई. अण्णांप्रमाणेच याही साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या.

शांताबाई आणि शकुंतलाबाई या त्यांच्या दोन मुली.

आई आणि घरातील मोठे लोक दोर वळण्याच्या कामाला जात.

 त्यांचे वडील पोटापाण्यासाठीच मुंबईत राहत असत.

त्यामुळे लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी तुकारामांवर (अण्णांचे मूळ नाव) म्हणजेच अण्णा भाऊंवर होती.

त्यांच्या वडिलांनी मुंबईत उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित समाज पाहिल्याने आपल्या मुलांनी शिकले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती.

त्यांच्या आग्रहामुळेच वयाच्या १४ व्या वर्षी अण्णांनी प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली.

परंतु तत्कालीन मागास जातींतील मुलांसाठी त्या काळी वेगळ्या शाळा होत्या.

 त्या मुलांशी शिक्षकांचे वर्तनही निर्दयीपणाचे होते.

वाढलेले वय, सदोष शिक्षण पद्धती यांमुळे अण्णा फार दिवस शाळेत गेलेच नाहीत.

लहानपणापासूनच त्यांना विविध छंद होते.

मैदानी खेळ खेळण्याचा त्यांचा पिढीजात वारसा असल्याने दांडपट्टा चालविण्यात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हते.

 याशिवाय जंगलात एकटे भटकणे,
पोहणे,
मासेमारी,
 शिकार करणे,
विविध पक्षांशी मैत्री करणे,
 जंगलातील पानाफुलांमधील सूक्ष्म फरक शोधणे
 असे एक ना अनेक छंद त्यांना होते.

या छंदांमध्ये निरागसपणे बागडण्यातच त्यांचे बालपण गेले.

मोठे होत असताना त्यांच्या आवडींमध्ये वाढच होत होती.

 लोकगीते पाठ करून ती टिपेच्या आवाजात म्हणणे,

 पोवाडे,
लावण्या पाठ करणे,
इतरांना त्या आत्मीयतेने म्हणून दाखवणे या छंदांमुळे त्यांच्याभोवती नेहमीच मित्र मंडळी जमलेली असत.

 रेठर्‍याच्या जत्रेत त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले.

त्याचा परिणाम अण्णा भाऊंवर झाला आणि ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊ लागले.

चळवळीत सामील होऊन लोकनाट्यांत छोटी मोठी कामे त्यांनी केली.

याच काळात दुष्काळ पडल्याने अण्णांच्या वडिलांनी आपल्या कुटुंबाला मुंबईत न्यायचे ठरविले.

त्याच वेळी अण्णा भाऊंचे बालपण संपले.

वयाच्या ११ व्या वर्षी अण्णा आपल्या आई-वडिलांबरोबर मुंबईत आले.

हे कुटुंब भायखळ्याच्या चांदबीबी चाळीत राहायला गेले.

त्या काळी मुंबईत स्वस्ताई असल्याने सुरुवातीचा काळ सुखाचा गेला.

मुंबईत फिरताना दोन गोष्टींकडे ते आकर्षिले गेले,

 एक म्हणजे विविध राजकीय संघटना आणि
दुसरे म्हणजे मूक चित्रपट.

विविध राजकीय संघटनांचे ध्येय ब्रिटिशांना हाकलून देणे हेच होते.

परंतु प्रत्येकाची विचारसरणी वेगळी होती.

यांपैकी कम्युनिस्ट विचारसरणीचे अण्णा अनुयायी बनले.

पक्षाच्या सभांचे आयोजन करणे,
वॉलपेंटिंग करणे,
हॅण्डबिले वाटणे,
मोर्चे काढणे,
छोट्या-मोठ्या सभेसमोर गोष्टी सांगणे,
पोवाडे,
लोकगीते म्हणून दाखविणे या सर्व गोष्टींमुळे कम्युनिस्ट वर्तुळात ते सर्वांना एकदम हवेहवेसे झाले.

याच वेळी त्यांच्या तुकाराम या नावाचे अण्णा या नावात रूपांतर झाले.

मुंबईत पोटासाठी वणवण भटकत असताना अण्णांनी हमाल,
बूट पॉलिशवाला,
 घरगडी,
हॉटेल बॉय,
कोळसे वाहक,
डोअरकीपर,
कुत्र्याला सांभाळणारा,
मुलांना खेळविणारा,
उधारी वसूल करणारा,
खाण कामगार,
ड्रेसिंगबॉय अशी नाना प्रकारची कामे केली.

यावरून त्यांच्या कष्टमय जीवनाची आपल्याला कल्पना येते.
या काळातच त्यांना सिनेमा पाहण्याचा छंद लागला.

या छंदानेच त्यांना साक्षर बनविले.

चित्रपटांच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांच्या बोर्डवरील अक्षरे जुळवित ते साक्षर झाले.

या अक्षर ओळखीनंतरच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.

वयाच्या १७-१८ व्या वर्षी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अण्णांवर आली होती.

गिरणी कामगार म्हणून त्यांच्या जीवनाला सुरुवात झाली होती.

 परंतु कोहिनूर मिलमधील नोकरी सुटल्याने त्यांच्यावर मोठेच संकट आले.

या वेळी पुन्हा साठे कुटुंब वटेगावला आले.


मुंबईतील धकाधकीचे जीवन, मोर्चे,
सभा,
सत्याग्रह,
आंदोलने या सर्व गोष्टी पाहिलेल्या अण्णा भाऊंना वटेगावमध्ये राहणे शक्य होत नव्हते.

अत्यंत अस्वस्थतेत त्यांनी घर सोडले आणि ते त्यांच्याच नातेवाईकांच्या तमाशाच्या फडात सामील झाले.

अण्णा भाऊंचा धारदार आवाज,
त्यांचे पाठांतर,
पेटी,
तबला,
ढोलकी,
बुलबुल ही वाद्ये वाजवण्याची कला या गुणांमुळे त्यांचे तमाशात स्वागतच झाले.

 *कार्य*:-

अण्णा भाऊ साठे हे लावण्या,
 शाहिरी काव्ये,
पोवाडा या लोककलांमध्ये तरबेज होते.

मराठीभाषिक स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीकरता इ.स. १९५० च्या दशकात चाललेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन घडवून आणले.

अण्णा भाऊ साठे यांची वगनाट्येही अत्यंत महत्त्वाची आहेत.

या वगनाटयांसाठी अण्णा भाऊंनी तमाशा या महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलेचा आकृतिबंध स्वीकारला.

तमाशाच्या पारंपरिक सादरीकरणातील गण,
 गवळण,
बतावणी
आणि वग
या घटकांपैकी गण, काही प्रमाणात बतावणी आणि वगनाटय हे तीन घटकच अण्णा भाऊंनी स्वीकारले.

 असे असले तरी तमाशाच्या पारंपरिक आकृतिबंधात अण्णा भाऊंनी वगनाटयाच्या रूपाने पुष्कळ बदल घडवून आणले.

अकलेची गोष्ट,
शेटजींचे इलेक्षन,
बेकायदेशीर,
माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची?,
मूक मिरवणूक,
लोकमंत्र्यांचा दौरा,
खापर्‍या चोर,
बिलंदर बडवे

यांसारखी वगनाटये अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची पायाभरणी करण्यासाठी लिहिली.

 त्यांतील गरुडाला पंख,
 वाघाला नखं तशी ही (मुंबई) मराठी मुलुखाला हे कवन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विलक्षण गाजले.

अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली प्रसिद्ध छक्कड(लावणीचा एक प्रकार) म्हणजे ‘माझी मैना गावाकडं राह्यली’.

या एका काव्यरचनेमुळे अण्णा भाऊ साठे यांचे नाव मराठी साहित्यात अविस्मरणीय असेल.

 *पुरस्कार आणि सन्मान*:-

पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे उद्‌घाटक (१९५८)

१९६१ साली, अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला.


तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि.स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा