पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

गुरुवार, २१ जानेवारी, २०१६

देशभक्ती गीत

🇮🇳🇮🇳 देशभक्ती गीत 🇮🇳🇮🇳

अजिंक्य भारत
अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे
ध्वज विजयाचा उंच धरा रे ll धृ.ll
मातीमधल्या कणांकणांतुन स्वातंत्र्याचे घुमते गायन
प्रगतीचे रे पाऊल पुढले संघटनेचा मंत्र जपा रे ll१ll
भाग्यवान ते जवान सगळे हासत खेळत रणी झुंजले
स्वातंत्र्यास्तव मरण जिंकले मान राखला मातृभूमीचा रे ll २ll
इतिहासाच्या पानोपानी बलिदानाची घुमती गाणी
धनदौलत रे देऊ उधळून पराक्रमाचे गीत गाउया रे ll ३ll

⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐

1 टिप्पणी:

  1. ध्वज विजयाचा उंच धरा रे कवितेसंदर्भात अतिरिक्त माहिती मिळेल का?

    उत्तर द्याहटवा