पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५

परिपाठ दि 6/11/2015 वार शुक्रवार

💥💻रा जि प शाळा चरई बुद्रुक ता तळा💻💻
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
    🌀💢💢 परीपाठ 💢💢🌀
🔳🔳🔳🔲🔲🙏🔲🔲🔳🔳🔳
🔹🔹दिनांक :-  06/11/2015🔹🔹
       🔸🔸वार - शुक्रवार🔸🔸
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
      🌀🙏🌟 राष्ट्रगीत 🌟🙏🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
       🌀🔶🌟 प्रतिज्ञा 🌟🔶🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌀🔷🌟 संविधान 🌟🔷🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१)     🔷 आजचे पंचाग 🔷
        ==============
05 कृष्ण पक्ष नवमीनक्षत्र : मघा
योग : ब्रह्म,  करण : गर
सूर्योदय : 06:40,  सूर्यास्त : 18:03
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
२)     🔶 सुविचार 🔶
       ============
छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
३)     🔷 म्हणी व अर्थ  🔷
        ==============
नाचता येईना अंगण वाकडे –
स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
४)      🔶 सुभाषित 🔶
         ============

* अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम्।
उदारचरितानां तु वसुधैवकुटम्बकम्॥
             * अर्थ *
- यह मेरा है, वह उसका है जैसे विचार केवल संकुचित मस्तिष्क वाले लोग ही सोचते हैं। विस्तृत मस्तिष्क वाले लोगों के विचार से तो वसुधा एक कुटुम्ब है।
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
५)       💥 दिनविशेष 💥
        ==============
६  नोव्हेंबर, शुक्रवार

*जागतिक दिवस*
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
संविधान दिन : डॉमिनिकन प्रजासत्ताक, ताजिकीस्तान
गुस्ताफस ऍडोल्फस दिन : स्वीडन.

ठळक घटना, घडामोडी
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
१८४४ : डॉमिनिकन प्रजासत्ताकने आपले पहिले संविधान अंगिकारले
१८६० : अब्राहम लिंकन अमेरिकेचा १६वा राष्ट्राध्यक्ष झाला
१८६१ : जेफरसन डेव्हिस कॉन्फेडरेट स्टेट्स ऑफ अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला
१९१३ : दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक
२००४ : इंग्लंडमध्ये उफ्टन गावाजवळ मोटारगाडीला रेल्वेगाडीची धडक. ६ ठार, १५० जखमी
२००५ : अमेरिकेच्या एव्हान्सव्हिल शहराजवळ टोर्नॅडोमुळे २५ ठार
२००५ : म्यानमारच्या लश्करी राजवटीने राजधानी रंगूनहून प्यिन्मना शहरास हलवली

*जन्म, वाढदिवस*
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
१४९४ : सुलेमान, ऑट्टोमन सम्राट
१६६१ : कार्लोस दुसरा, स्पेनचा राजा
१८४१ : आर्मांड फॅलियेरेस, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष
१८६० : इग्नास पादेरेव्स्की, पोलंडचा राष्ट्राध्यक्ष
१८७६ : अर्नी हेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
१८९३ : एड्सेल फोर्ड, अमेरिकन उद्योगपती
१८९७ : जॅक ओ'कॉनोर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
१९४६ : सॅली फील्ड, अमेरिकन अभिनेत्री
१९४८ : ग्लेन फ्रे, अमेरिकन संगीतकार
१९५६ : ग्रेम वूड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू

*मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन*
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
१२३१ : त्सुचिमिकाडो, जपानी सम्राट
१४०६ : पोप इनोसंट सातवा
१६३२ : गुस्ताफस ऍडोल्फस, स्वीडनचा राजा
१६५६ : होआव चौथा, पोर्तुगालचा राजा
१७९६ : कॅथेरिन दुसरी, रशियाची सम्राज्ञी
१८३६ : चार्ल्स दहावा, फ्रांसचा राजा
१९२५ : खै दिन्ह, व्हियेतनामचा राजा
१९८५ : संजीवकुमार, प्रसिद्ध हिंदी अभिनेते.
१९८७ : भालबा केळकर, मराठी लेखक, नाट्यअभिनेते
=============================
🌟 श्री प्रमोद दिगंबर मोरे 9404566070 🌟
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
६)        ⭕ समुहगित ⭕
         =============
$ अमुचा भारत देश महान $

परदास्याची तुटे शृंखला सरला अंध:कार
नभी तिरंगी निशाण चढले करुया जयजयकार

स्वतंत्र झाली भारतमाता आम्ही तिचे संतान
अमुचा भारत देश महान !

स्वराज्य येथे सुराज्य व्हावे
रामराज्य या भूवर यावे
त्रिखंडात या अखंड राहो अजिंक्य हिदुस्थान
अमुचा भारत देश महान !

या देशाला शिकवून भक्ती
गांधिजींनी केली मुक्ती
राष्ट्रपित्याने दिले अम्हाला चिरंजीव वरदान
अमुचा भारत देश महान !

गरीब कोणी, अमीर कोणी
या मातीला समान दोन्ही
माणुसकीचे पाईक आम्ही, नाही थोर लहान
अमुचा भारत देश महान !
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
७)       ⭕ देशभक्ती गीत ⭕
       ================
$ बलसागर भारत होवो $

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो

हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो

वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो

हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो

करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो

या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो

ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
८)      💢🙏 प्रार्थना 🙏💢
         ===============
$ अविरत पुढे पुढे जाऊ $

अविरत पुढे पुढे जाऊ
अम्हि ना विश्रांति आता घेऊ॥धृ॥

उध्दराया पूर्वज शापित घोर आचरुनि तप हे अविरत
मुक्ति मिळवुनी देइ भगीरथ सातत्याने भगीरथाच्या
पुढे पुढे जाऊ॥१॥

शांत सागरी सेतू बांधून नष्ट कराया संकट दारूण
जाई वानरासह रघुनंदन त्या धैर्याने रघुरायच्या
पुढे पुढे जाऊ॥२॥

स्वर्गी तो देवेन्द्र कोपला गारायुत पर्जन्य वर्षला
गोवर्धन गोपांनि उचलला चातुर्याने श्रीकृष्णाच्या
पुढे पुढे जाऊ॥३॥

धुमाकुळ यवनांचा चाले आवर घाली शिवराय बळे
घेवुनि संगे मित्र मावळे त्या शिवराया साक्ष ठेवुनी
पुढे पुढे जाऊ॥४॥

सातत्याच्या अन् धैर्याच्या चातुर्याच्या संघटनेच्या
मातृभूमिच्या उध्दाराच्या महाजनांच्या त्याच पथाने
पुढे पुढे जाऊ॥५॥
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 ९)     🌀🌀 बोधकथा 🌀🌀
        =================
$ आचार्य विनोबा भावे $

भूदान चळवळीच्‍या काळातील ही गोष्‍ट आहे. या चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते. त्‍यांची पदयात्रा सुरु होती. आपल्‍या काही शिष्‍यांसह विनोबाजी मीराजींच्‍या आश्रमात थांबले होते. अल्‍पशा विश्रांतीनंतर त्‍यांची पदयात्रा पुन्‍हा सुरु झाली. त्यावेळी ते हरिद्वारकडे चालले होते. विनोबाजींची प्रकृती थोडी ठीक नव्‍हती. त्‍यांची कंबर आणि पाय दुखत होते. त्‍यामुळे त्‍यांना खुर्चीत बसवून नेण्‍यात येत होते. मध्‍ये मध्‍ये खुर्चीतून उतरून पायी चालायचे. तेव्‍हा एक शिष्‍य त्‍यांच्‍याजवळ येऊन म्‍हणाला,'' बाबा, मला खूप राग येतो, मी काय करावे'' विनोबाजी म्‍हणाले,'' मी लहान असताना मलाही खूप राग यायचा, मग माझ्याजवळ मिश्री असायची ती मी तोंडात ठेवायचो, परंतु कधीकधी ती ही नसायची'' मग तुम्‍ही काय करत होता असे त्‍या व्‍यक्तीने विचारले. विनोबाजी म्‍हणाले,'' मी यावर खूप विचार केला, मग माझ्या मनात एक गोष्‍ट आली. जेव्‍हा आपल्‍या मनाविरूद्ध एखादी गोष्‍ट आली जेव्‍हा आपल्‍या मनाविरूद्ध गोष्‍ट घडली तर लगेच नाराज होतो जर तो क्षणच आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो. आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्‍हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्‍यावर वरचढ ठरू पाहतो. तो क्षण टाळणे कठीण आहे. पण मनन करून तो टाळता येतो. मी यावर खूप मनन केले, यामुळेच जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही.''

तात्‍पर्य :-
 विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्‍याला योग्‍य दिशा देते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१०)   💥 प्रेरणादायी विचार 💥
        =================
आकाशातील 'ग्रह '
पृथ्वीवरील माणसांवर
परिणाम करतात की नाही,
हा वादाचा विषय असू शकतो.

परंतु ,
माणसं एकमेकांबद्दल
जे 'ग्रह' करून घेतात;
ते मात्र माणसांच्या जीवनावर
निश्चित परिणाम करतात.  
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
११)   🔳 सामान्य नान 🔳
        ==============

* महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
* महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
* महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
* महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
* महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१२)   💢थोरव्यक्ती परिचय💢
        =================
$ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन $

२ रे भारतीय राष्ट्रपती
कार्यकाळ
मे १३, इ.स. १९६२ – मे १३, इ.स. १९६७

*जन्म सप्टेंबर ५, इ.स. १८८८
*तिरुत्तनी, तमिळनाडू तील एक छोटे गाव, दक्षिण भारत
*मृत्यू एप्रिल १७, इ.स. १९७५
*राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
*पत्नी सिवाकामुअम्मा
*अपत्ये पाच मुली व एक पुत्र, सर्वपल्ली गोपाल
*व्यवसाय राजनितीज्ञ, तत्त्वज्ञ, प्राध्यापक
*धर्म वेदान्त (हिंदू)

  सर्वपल्ली राधाकृष्णन' हे भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्‍ज्ञ हाते. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन (सप्टेंबर ५, इ.स. १८८८:तिरुत्तनी, तमिळनाडू - १७ एप्रिल १९७५) हे भारताचे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळ (इ.स. १९५२ - इ.स. १९६२) असा आहे. त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुत्तनी या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई (मद्रास) शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे. राधाकृषणन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो.

   पाश्चात्त्य जगताला भारतीय चिद्‌वादाचा तात्त्विक परिचय करून देणारा भारतावरील ब्रिटिश सत्ताकाळातला महत्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते. भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठानेत्यांच्या नावाने 'राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट' हा पुरस्कार ठेवला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
                        ✒✏▪संकलन▪✏✒
                  🌟श्री प्रमोद दिगंबर मोरे 🌟
                    💥📱9404566070📱💥
 💻रा जि प शाळा चरई बु ता तळा जि रायगड💻
             💢💢💢💢💥🙏💥💢💢💢💢

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा