पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

बुधवार, २७ मे, २०१५

बारावीचा निकाल जाहीर निकालात कोकण विभागाची बाजी

बारावीचा निकाल जाहीर, निकालात कोकणची बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी, मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे
Board exams in Agartalaमुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी, मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.२६ टक्के लागला आहे.
या निकालात कोकण विभागाने बाजी मारली असून या विभागातील ९५.६८ टक्के विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले आहेत. तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी लागला असून या विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ८८.१३ टक्के इतके आहे. बारावीच्या परीक्षेत मुंबईतील ९०.११ टक्के विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले आहेत.
बारावीला सर्व शाखांमधून १३ लाख ३९ हजार ९९ विद्यार्थी बसले होते. या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९४.२९ टक्के इतके आहे. तर मुलांचे प्रमाण ८८.७० टक्के इतके आहे.
विभागानिहाय राज्याचा निकाल
कोकण – ९५.६८
मुंबई – ९०.११
नाशिक – ८८.१३
नागपूर – ९२.११
अमरावती – ९२.५०
कोल्हापूर – ९२.१३
लातूर – ९१.९३
पुणे – ९१.९६
औरंगाबाद – ९१.७७
राज्याचा शाखानिहाय निकाल
विज्ञान – ९५.७२ टक्के
कला – ८६.३१ टक्के
वाणिज्य – ९१.६०
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम – ८९.२०
चार जून रोजी चार वाजता विद्यार्थ्यांना महाविद्यालयात गुणपत्रिका मिळणार आहेत. गुण पडताळणीसाठी मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना १५ जूनपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.
तर ऑक्टोबर परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. तसेच उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यापासून १५ जूनपर्यंत मंडळाकडे अर्ज करता येईल.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा