दप्तर यंदापासून
हलके ;' सकाळ ' च्या
जागराची दाखल
23 मे 2015 - 01: 15 AM IST
कोल्हापूर - यंदाच्या शैक्षणिक
वर्षापासून दप्तराच्या ओझ्याचा
प्रश्न निकालात निघालेला असेल,
अशी स्पष्ट ग्वाही शिक्षणमंत्री
विनोद तावडे यांनी आज येथे दिली .
"सकाळ ' ने राज्यभर या प्रश्नाचा
जागर केल्यानंतर
शिक्षणमंत्र्यांनी याप्रश्नी
पुढाकार घेत शालेय दप्तराचे ओझे
कमी करण्याचा निर्णय घेतला असून ,
यासंबंधीच्या 44 तरतुदींचा समावेश
असलेला प्रस्ताव अंतिम
मंजुरीसाठी ठेवला गेला आहे .
भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या
बैठकीच्या निमित्ताने येथे
आलेल्या तावडे यांनी पत्रकारांशी
संवाद साधला. ते म्हणाले , की
दप्तराचे ओझे विद्यार्थ्यांच्या
आवाक्याबाहेर गेले आहे . ज्या वयात
हसत- खेळत शिक्षण घ्यायचे त्या
वयात ओझे वाहून नेण्याची वेळ आली
आहे . मध्यंतरी मुंबईत आपण शाळेला
प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांचे
दप्तराचे ओझे नेमके किती होते,
याची माहिती घेतली. अनेक
विद्यार्थ्यांचे ओझे पाच
किलोच्या वर होते. अनेकांना
पाठीच्या दुखण्याचा त्रास होतो.
शालेय शिक्षण विभागाने राज्यभर
विविध घटकांशी चर्चा करून मते
विचारात घेतली . अगदी पहिली ते
दहावीपर्यंत ओझे किती असावे . एका
पुस्तकात दोन - तीन विषयांचा समावेश
केला तर काय होईल . गृहपाठाच्या
वह्या घरी न देता त्या शाळेत
ठेवाव्यात, ज्या दिवशी ज्या
विषयाचे तास असतील तेवढेच दप्तर
शाळेत आणावे या अनुषंगाने विचार
झाला . प्रस्ताव सध्या अंतिम
टप्प्यात आहे . जूनपासून नवे
शैक्षणिक सत्र सुरू झाले की
दप्तराच्या ओझ्याचा प्रश्न
राहिलेला नसेल . इयत्तानिहाय दप्तर
किती असावे , याचा अभ्यास झाला
आहे . त्यानुसार प्रत्येक इयत्तेचे
वेळापत्रक तयार आहे . शिक्षकांनी
वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना
दप्तर आणण्याची सूचना करावी.
पालकांनी अतिरिक्त ओझ्याचा
विचार न करता शिक्षक सांगतील
तेवढेच दप्तर द्यावे .
पालकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न
असलेल्या दप्तराच्या ओझ्याकडे
"सकाळ ' ने राज्य शासनाचे लक्ष वेघले
होते . राज्यभर डॉक्टरांसह विविध
तज्ज्ञांची मते विचारात घेऊन
नेमक्या कशा पद्धतीने ओझे कमी
करता येईल , याची शास्त्रशुद्ध
मांडणी केली . शासनाने दखल घेतली
असून , दप्तराच्या ओझ्याने वाकलेले
विद्यार्थी यापुढे नजरेस पडणार
नाही.
हलके ;' सकाळ ' च्या
जागराची दाखल
23 मे 2015 - 01: 15 AM IST
कोल्हापूर - यंदाच्या शैक्षणिक
वर्षापासून दप्तराच्या ओझ्याचा
प्रश्न निकालात निघालेला असेल,
अशी स्पष्ट ग्वाही शिक्षणमंत्री
विनोद तावडे यांनी आज येथे दिली .
"सकाळ ' ने राज्यभर या प्रश्नाचा
जागर केल्यानंतर
शिक्षणमंत्र्यांनी याप्रश्नी
पुढाकार घेत शालेय दप्तराचे ओझे
कमी करण्याचा निर्णय घेतला असून ,
यासंबंधीच्या 44 तरतुदींचा समावेश
असलेला प्रस्ताव अंतिम
मंजुरीसाठी ठेवला गेला आहे .
भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या
बैठकीच्या निमित्ताने येथे
आलेल्या तावडे यांनी पत्रकारांशी
संवाद साधला. ते म्हणाले , की
दप्तराचे ओझे विद्यार्थ्यांच्या
आवाक्याबाहेर गेले आहे . ज्या वयात
हसत- खेळत शिक्षण घ्यायचे त्या
वयात ओझे वाहून नेण्याची वेळ आली
आहे . मध्यंतरी मुंबईत आपण शाळेला
प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांचे
दप्तराचे ओझे नेमके किती होते,
याची माहिती घेतली. अनेक
विद्यार्थ्यांचे ओझे पाच
किलोच्या वर होते. अनेकांना
पाठीच्या दुखण्याचा त्रास होतो.
शालेय शिक्षण विभागाने राज्यभर
विविध घटकांशी चर्चा करून मते
विचारात घेतली . अगदी पहिली ते
दहावीपर्यंत ओझे किती असावे . एका
पुस्तकात दोन - तीन विषयांचा समावेश
केला तर काय होईल . गृहपाठाच्या
वह्या घरी न देता त्या शाळेत
ठेवाव्यात, ज्या दिवशी ज्या
विषयाचे तास असतील तेवढेच दप्तर
शाळेत आणावे या अनुषंगाने विचार
झाला . प्रस्ताव सध्या अंतिम
टप्प्यात आहे . जूनपासून नवे
शैक्षणिक सत्र सुरू झाले की
दप्तराच्या ओझ्याचा प्रश्न
राहिलेला नसेल . इयत्तानिहाय दप्तर
किती असावे , याचा अभ्यास झाला
आहे . त्यानुसार प्रत्येक इयत्तेचे
वेळापत्रक तयार आहे . शिक्षकांनी
वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना
दप्तर आणण्याची सूचना करावी.
पालकांनी अतिरिक्त ओझ्याचा
विचार न करता शिक्षक सांगतील
तेवढेच दप्तर द्यावे .
पालकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न
असलेल्या दप्तराच्या ओझ्याकडे
"सकाळ ' ने राज्य शासनाचे लक्ष वेघले
होते . राज्यभर डॉक्टरांसह विविध
तज्ज्ञांची मते विचारात घेऊन
नेमक्या कशा पद्धतीने ओझे कमी
करता येईल , याची शास्त्रशुद्ध
मांडणी केली . शासनाने दखल घेतली
असून , दप्तराच्या ओझ्याने वाकलेले
विद्यार्थी यापुढे नजरेस पडणार
नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा